Sadabhau Khot-Devendra Fadnavis
Sadabhau Khot-Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

फडणवीसांमुळे सातवी पास माणसाने दिड लाख रुपये पगार घेतला : सदाभाऊ खोतांची कृतज्ञता

सरकारनामा ब्युरो

माढा : सदाभाऊ खोत यांना आता आमदारकी हवी आहे म्हणून ते सभा घेतात. टीका करतात. पण एक सांगतो, ३० वर्ष हा पठ्ठ्या चळवळीमध्ये काम करत होता. अनेक वेळा तुरुंगात गेलो, बाहेर आलो. आम्ही आमदारकीसाठी जन्माला आलेलो नाही. आमचा जीव आमदारकीमध्ये नाही तर आमचा जीव सामान्य माणसांमध्ये आहेत. काय करायची आहे ती आमदारकी, खासदारकी. पण झालो मी, गोपीचंद पडळकर आमदार झालो. महादेव जानकर मंत्री झाले, असे म्हणतं रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपला लढा आमदारकीसाठी नसल्याचे म्हणतं विरोधकांना निरुत्तर केले.

सदाभाऊ खोत आज 'सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' या यात्रेच्या सांगता सभेत बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर कौतूक केले.

सदाभाऊ पुढे म्हणाले, पडळकर, मी, दरेकर आमच्यासारखी फाटकी माणसं फडणवीस यांच्यासोबत आहेत. आमच्यावर जबाबदारी द्या भल्या-भल्यांना लोळवल्याशिवाय राहणार नाही. मी पहाटे ४ ते ५ वाजेपर्यंत काम करणारा मुख्यमंत्री बघितला आहे. आताचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करतात आणि म्हणतात, जायचं काय काम आहे? अखंड महाराष्ट्र मला इथे दिसतोय. त्यामुळे आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कर्तबगार माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पुन्हा आणायचा आहे.

हा लढा आम्हाला लढायचा आहे. कारण आमचे गमावयाला काय नाही आणि कमवायला काही नाही. मी चळवळीत होतो तेव्हा पैसे मागून पुढच्या गावाला जायचो. त्यातुन राहिलेल्या पैशांमधून घर चालायचं. हळू हळू देवेंद्र फडणवीसांसोबत आलो. त्यांनी आमदार केले. त्यांच्यामुळे सातवी नापास गडी दिड लाख पगार घेतला. आता मरेपर्यंत पेन्शन आहे. एसटी फुकट आहे. आता मरेपर्यंत तुम्ही सोय केली, आता आम्ही मरेपर्यंत तुमच्यासोबत आहे. खंद्याला खंदा लावून लढणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT