Sadabhau Khot
Sadabhau Khot Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

केतकी चितळेचे सदाभाऊ खोतांनी केले समर्थन : म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या विषयी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या धर्तीवर विडंबन काव्य तयार करण्यात आले. हे विडंबन काव्य अभिनेत्री केतकी चितळेने सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे ती वादात सापडली आहे. या केतकीच्या समर्थन शेतकरी नेते सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी केले. ( Sadabhau Khot supported Ketki Chitale: said ... )

केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी केतकीचे केले समर्थन आहे सदाभाऊ खोत हे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आले होते दरम्यान त्यांनी केतकीच्या समर्थन केले आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्या वर वादग्रस्त पोस्ट केली होती. तिचे समर्थन करत केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली असे म्हणत देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती.

ते पुढे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली. त्यावेळी नैतिकता कुठे होती, असा प्रश्न उपस्थित केला. या सोबतच अमोल मिटकरीने देखील ब्राम्हण समाजाला टार्गेट केले. त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का ..? असे म्हणत सरकारवर टीका केली. स्वतःवर टीका केली की सगळे आठवते राज्यात सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवला असून प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांच्यावर अन्याय केला आहे. आम्हाला हा प्रस्थापितांच्या वाडा पाडायचा असल्याचे खोत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT