<div class="paragraphs"><p>Sadabhau Khot&nbsp;</p></div>

Sadabhau Khot 

 
पश्चिम महाराष्ट्र

बैलगाडा शर्यत बंदी उठल्याबद्दल सदाभाऊंकडून फडणविसांचा सत्कार

सरकारनामा ब्युरो

सांगली: राज्यात बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात, यासाठी सात वर्षांपासून कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई सुरु होती. ती अखेर जिंकली. आता बळीराजाचा उत्सव पुन्हा सुरु होणार, या निकालाने गेल्या अनेक वर्षांची त्याची प्रतिक्षा संपली आहे. शर्यत नव्हे तर खिलार वंश वाचवणारा हा निर्णय आहे, अशा भावना आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सशर्त मान्यता दिली. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या बंदी उठवण्याच्या संघर्षाला यश आले आहे. या निर्णयानंततर सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा सत्कार केला. त्यानंतर ते बोलत होते.

ते म्हणाले,‘‘बळीराजा, बैलगाडी मालक व चालकांच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सवाचा एक मोठा विजय आहे. गेले सात वर्षे बैलगाड्या शर्यतीसाठी रस्त्यावरची आणि कायदेशीर लढाई सुरु होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सभागृहात कायदा केला. पशुतज्ञांची एक समिती नेमून कर्नाटक, तामिळनाडूत सुरु असलेल्या बैल उत्सवाचा अभ्यास केला. बैल हा जंगली नव्हे तर पाळीव प्राणी आहे आणि तो शर्यतीला पळणारा प्राणी आहे, अशा पद्धतीची चांगली मांडणी केली. त्या समितीने ती न्यायालयापुढे आणली. सर्वोच न्यायालयात तो अहवाल सादर झाला.’’

ते म्हणाले, ‘‘अनेकांनी त्यात पाठपुरावा केला. सध्याच्या सरकारनेही त्यात पाठपुरावा केला. राज्यातील जे खिलार पशुधन आहे, त्याची उपयुक्तता दुधासाठी नसून त्याच्या पोटी जन्माला येणारा खिलार बैल शेतात मशागत आणि शर्यतीसाठी आहे. अलिकडे शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहे. परिणामी खिलारची उपयुक्तता संपत चालली होती. शर्यती बंद झाल्या असत्या तर खिलार गाय आणि खोंड नामषेश किंबहुना नष्ट झाली असती. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे वरदान असणारी ही जात नष्ट होणे हातून घात करण्यासारखे ठरले असते. त्यामुळे हा निकाल सर्वार्थाने महत्वाचा आहे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT