Vikram Pavaskar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJPLeader Controversial Appeal : भाजप नेत्याचे पुन्हा वादग्रस्त आवाहन; ‘स्वातंत्र्यदिनी तिरंग्याशेजारी भगवाही उभारावा’

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur : तिरंग्याइतकेच भगव्याचे महत्व आहे, त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी तिरंग्याशेजारी आता भगवा ध्वजही उभारण्यात यावा, असे धक्कादायक आवाहन हिंदू एकता समितीचे नेते तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी विक्रम पावसकर यांनी केले. पावसकर यांच्या या आवाहनामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Saffron flag should also be hoisted next to the tricolor on Independence Day : Vikram Pavaskar)

विक्रम पावसकर हे कोल्हापूरमध्ये बोलत होते. दरम्यान, अशाच प्रकारचे विधान यापूर्वी संभाजी भिडे यांनीही केले होते. त्यात आता पावसकर यांनीही तीच मागणी केल्याने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विक्रम पावसकर हे कराड नगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. हिंदू एकता आंदोलनासाठी ते काम करतात. विशाळगड येथील अतिक्रमण काढण्यासाठी ते कायम पाठपुरावा करत आलेले आहेत.

पावसकर म्हणाले की, पूर्वजांपासून भगवा ध्वज लावण्याची परंपरा आहे. हिंदुस्थानातील अनेक राजे-महाराजेही भगवा ध्वज लावत होते, त्यामुळे या ध्वजाला मोठे महत्त्व आहे, त्यामुळे तिरंग्याशेजारी हा भगवा ध्वजही लावण्या यावा. शाळांमध्ये हिंदू मुलींनी टिकली लावली, हातात किंवा गळ्यात दोरा बांधला तर अडवणूक होते. इतर धर्माची अडवणूक होत नाही.

हिंदू मुले ही आमची धार्मिकता जपण्याचं काम करत आहेत, त्यामुळे त्यांची अडवणूक आम्ही खपवून घेणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही त्यासाठी रस्तावर उतरू, असा इशाराही विक्रम पावसकर यांनी दिला.

लव्ह जिहादविरोधात महाराष्ट्रात कडक कायदा करावा, अशी आमची मागणी आहे. सध्याचे सरकार त्या दृष्टीने काम करत आहे. लव्ह जिहादविरोधात कायदा तयार करण्यासाठी सात जणांची समिती तयार करण्यात आलेली आहे. तीन ते चार राज्यांत तयार झालेल्या कायद्याचा अभ्यास करून आपल्याकडे अत्यंत कडक असा कायदा येईल, अशी आमची अपेक्षा आहे, असेही पावसकर यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT