saibaba
saibaba Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

साई संस्थान : आशुतोष काळे यांची नियुक्ती झाली पण अजूनही कारभार हाती नाही..

Amit Awari

अहमदनगर : शिर्डी येथील साई संस्थानचे नवीन विश्वस्त मंडळ महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते. मात्र उच्च न्यायालयाने नवनियुक्त विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवले आहे. या नवनियुक्त मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांना अध्यक्षपद मिळाले होते. Sai Sansthan: Ashutosh Kale has been appointed but he is still not in charge.

राज्य सरकारने हे विश्वस्त मंडळ नियुक्त करताना न्यायालयाची परवानगी घेतली नाही असा आरोप आहे. या संदर्भातील याचिकेवर आज सुनावणी झाली. यात साई संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त व्यवस्था मंडळालाचे अधिकार गोठवलेले कायम असून शपथ पत्र सादर करण्यासाठी राज्य शासनाने मुदत वाढ मागवली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी 14 डिसेंबरला होणार आहे.

पुढील आदेशापर्यंत तदर्थ समितीला कारभार पाहण्याचे आदेश दिले आहे. नवनियुक्त विश्वस्त मंडळाला पुन्हा कामकाजापासून रोखण्यात आले यामुळे राज्य शासनाला पुन्हा एकदा धक्का बसला असून याचिकेवर 14 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

त्यामुळे शिर्डी संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाने नियुक्तीसाठीचे सत्कार स्वीकारले मात्र पदभार स्वीकारण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. अनेक वर्ष हे देवस्थान काँग्रेसकडे होते. आमदार काळे यांच्या रुपाने पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडे या देवस्थानचे अध्यक्षपद मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT