Sambhaji Bhide Guruji Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Bhide : संभाजी भिडे गुरुजींचा कुत्र्याने घेतला चावा; रुग्णालयात उपचार सुरू

Sambhaji Bhide Dog Attack : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सांगलीत कुत्र्याने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री ते त्यांच्या घराच्या दिशेने जात असताना कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतला.

Jagdish Patil

Sangli News, 15 Apr : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सांगलीत कुत्र्याने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री ते त्यांच्या घराच्या दिशेने जात असताना कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतला.

याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिलं आहे. सामच्या वृत्तानुसार, सांगली शहरातील माळी गल्ली परिसरात ही घटना घडली.कुत्र्याच्या हल्ल्या भिडे गुरुजी जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.14) रात्री 11 च्या सुमारास एका धारकऱ्याच्या घरून जेवून परतत असताना ते माळी गल्ली येथे आले असता एका कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करत पायाचा चावा घेतला. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोण आहेत संभाजी भिडे?

संभाजी भिडे हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना धारकरी असं म्हटलं जातं. प्रखर हिंदुत्ववादी अशी भिडे गुरूजींची ओळख आहे. ते दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध गडांवर गडकोट मोहीम आयोजित करतात.

यामध्ये हजारोंच्या संख्येने राज्यभरातील धारकरी सहभागी होतात. शिवाय ते सतत त्यांच्या विविध वक्तव्यामुळेही चर्चेत असतात. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक नेते त्यांना आपले गुरू मानतात.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT