Sambhaji Bhide sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Bhide : मराठ्यांनी देश चालवायचा, आरक्षण का मागावं? संभाजी भिडेंचा सवाल

Akshay Sabale

एक वर्षांहून अधिक कालावधीपासून मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील हे मराठा मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. सरकारनं 10 टक्के आरक्षण दिलं आहे. पण, जरांगे-पाटील हे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. यातच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. मग मराठ्यांनी आरक्षण का मागावे? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीनं सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. याची माहिती संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संभाजी भिडे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

"मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. पण, मराठे म्हणजे वाघ आणि सिंह आहेत. संपूर्ण जंगल तुमचे आहे. मग मराठ्यांनी आरक्षण ( Maratha Reservation ) मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा असतो. आरक्षण कुठे घेऊन बसलाय.." असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला आहे.

रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरही संभाजी भिडे यांनी मत व्यक्त केलं आहे. "रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली, तीच आमची भूमिका आहे. पण, उद्धव ठाकरे काही गोष्टींवर भाष्य करत नाहीत," असं भिडे यांनी म्हटलं.

'लाडकी बहीण योजने'वरून संभाजी भिडे यांनी शिंदे सरकारला सल्ला दिला आहे. "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जरी चांगली असली, तरी त्यात महिलांना मानधन देऊन नव्हे, तर त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही, याचीही व्यवस्था सरकारनं करावी," असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

"बांगलादेशमध्ये सुरू असलेला नंगानाच हा तात्काळ थांबायला हवा, यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा," अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT