Sangali Gram Panchayat Election Result  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat Election 2023 Result : सांगलीत भाजपने गुलाल उधळला; पण पालकमंत्र्यांच्या पॅनेलचा धुव्वा

Sangali Gram Panchayat Election Result : जत तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपला प्रभाव कायम राखला.

Rahul Gadkar

Sangli Political News : सांगली जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक 31 ग्रामपंचायत भाजपने आपल्या ताब्यात घेऊन जिल्ह्यातील वर्चस्व सिद्ध केले आहे. २७ ग्रामपंचायती जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने सात तर शिंदे गटाच्या शिवसेनेने सहा ग्रामपंचायती जिंकल्या.

विशेष म्हणजे या ठिकाणी मनसेनेही एक ग्रामपंचायत जिंकून ग्रामीण राजकारणात प्रवेश केला आहे. १३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध आणि ११ ग्रामपंचायतीचे (Grampanchayat) ३ पॅनेल बिनविरोध झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, थेट सरपंच निवडीमुळे सात ठिकाणी सत्ता एकाची आणि सरपंच वेगळ्या गटाचा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजप (BJP) खासदार संजय पाटील यांचे समर्थक भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर यांनी हरिपूरची सत्ता राखली. त्यांनी काँग्रेसच्या मोहिते गटाचा पराभव केला. मोहिते गटाने सहा जागा जिंकत तांबवेकर यांच्या एकहाती सत्तेसमोर आव्हान निर्माण होईल, एवढी लढत दिली.

-कोणत्या ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता?

नांद्रे गावात काँग्रेसचा वरचष्मा कायम राहिला. पलूस तालुक्यातील कुंडल या सर्वांत मोठ्या गावात राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अरुण लाड यांच्या गटाने मोठे यश मिळवले. काँग्रेसच्या महेंद्र लाड गटाने केवळ तीन जागांवर यश मिळवले.

आटपाडी तालुक्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव वाढल्याचे दिसून आले. खानापूर तालुक्यात बाबर-पाटील गटाने दोन-दोन ग्रामपंचायती जिंकल्या. जत तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपला प्रभाव कायम राखला.

कवठेमहांकाळ तालुक्यात आर. आर. आबा गट आणि घोरपडे गटाने सात गावांत सत्ता मिळवली, तेथे भाजपची पीछेहाट झाली आहे. मनसेकडे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत असून, ती या वेळीही कायम ठेवण्यात जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना यश मिळाले.

- पालकमंत्री सुरेश खाड़े यांच्या पॅनेलचा धुव्वा

मिरज तालुक्यातील जानराववाड़ी आणि निलज़ी बामणी या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आपले पॅनेल उभे केले होते. मात्र, ग्रामस्थांनी या पॅनेलला नाकारल्याचे दिसून आले. खूप प्रयत्न करूनही त्यांच्या पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. भाजप आणि पालकमंत्री खाडे यांना मोठा धक्का मानाला जातो. या दोन्ही गावांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.

- शिराळ्यात आमदार मानसिंग नाईकांचे वर्चस्व

२९ पैकी सर्वाधिक १७ ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवून आमदार मानसिंगराव नाईक व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी आपले वर्चस्व कायम राखले. शिवाय आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून गावगाड्यातील प्रत्येक हालचाली गतिमान झाल्या होत्या. पण नाईक यांना ग्रामीण मतदारांना कौल दिल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT