Sangali Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Politics: Video विशाल पाटलांच्या बंडखोरीनं संतापलेल्या ठाकरेंचा सूर झाला मवाळ; सांगलीसाठी आघाडीचा फॉर्म्युला ठरला?

Sangali Assembly Election Mahavikas Aaghadi formula: महाविकास आघाडीच्या विरोधात दंड थोपटणारे विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ठाकरे यांना भेटले. या भेटीत विधानसभा जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते.

सरकारनामा ब्यूरो

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बुधवारी दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा केली. अशातच सांगलीचे काँग्रेस समर्थक खासदार विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी करत विशाल पाटील अपक्ष म्हणून लढले आणि विजयी झाले. महाविकास आघाडीच्या विरोधात दंड थोपटणारे विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ठाकरे यांना भेटले. या भेटीत सांगलीतील विधानसभा जागा वाटपाबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. विशाल पाटलांच्या बंडखोरीनं संतापलेल्या ठाकरेंचा सूर आता मवाळ झाला असल्याचे दिसते.

बुधवारी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांची खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी भेट घेतली. या भेटीत सांगलीतील जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. सांगलीवरुन कोणतेही मतभेद नसल्याचे ठाकरेंच्या भेटीनंतर आमदार विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले.

सांगलीतील लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेल होते. हा पराभव ठाकरेंच्या जिव्हारी लागला होता. मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. सांगलीत मविआची ही एकजूट आता किती फायद्याची ठरेल ते विधानसभा निकालाताच स्पष्ट होईल.

सांगलीतील लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील चितपट झाले. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सांगलीमध्ये लोकसभेसारखी परिस्थिती होऊ नये म्हणून आघाडीतील नेते सावध पावलं उचलत असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT