Sangli District Bank News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News: शेतकऱ्यांच्या पैशांवर सांगली जिल्हा बँकेतील कर्मचार्‍यानेच मारला डल्ला, दोषींवर मोठी कारवाई

Sangli District Bank News: शासनाकडून जिल्हा बँकेतील शेतकर्‍यांच्या खात्यावर विविध प्रकारचे अनुदान, विमा रक्कम देण्यात येते. ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर पाठवली जाते. यातील अनेक खात्यावरील रक्कम काढली जात नाही.

Jagdish Patil

Sangli District Bank News: सांगली जिल्हा बँकेतील कर्मचार्‍याने दुष्काळ मदत निधी हडपल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सांगली बँकेच्या (Sangli District Bank) सिद्धेवाडी शाखेत शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील तब्बल 7.73 लाख रकमेवर कर्मचार्‍याने डल्ला मारला. तर याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल शाखाधिकारी व्ही. एस. सूर्यवंशी यांच्यासह निधी अपहार करणारा कर्मचारी एस. व्ही. कोळी या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे. तर जिल्हा बँकेच्या तासगाव (Tasgaon) मार्केट यार्ड शाखेतील अपहाराची माहिती लपविल्याबद्दल तिघांची तडकाफडकी बदली बँक प्रशासनाने केली आहे.

शासनाकडून (Sangli) जिल्हा बँकेतील शेतकर्‍यांच्या खात्यावर विविध प्रकारचे अनुदान, विमा रक्कम देण्यात येते. ही रक्कम शेतकर्‍यांच्या (Farmer) खात्यावर पाठवली जाते. यातील अनेक खात्यावरील रक्कम काढली जात नाही. अनेक वर्षापासून कोट्यवधी रुपयाची रक्कम तशीच पडून असते. याच शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारल्याचा प्रकार तासगाव (Tasgaon) मार्केट यार्ड शाखेत घडला. तर सिद्धेवाडी शाखेतही असाच प्रकार उघडकीस आला आहे. दुष्काळ निधी अपहारप्रकरणी दोषींवर मागील आठवड्यात कारवाई करण्यात आली होती.

7.73 लाखांचा अपहार

सिद्धेवाडी शाखेची (Siddhewadi Branch) चौकशी अधिकार्‍यांमार्फत करण्यात आली. त्यामध्ये शाखा लिपीक एस. व्ही कोळी याने 7.73 लाखांचा अपहार केल्यांचं उघडकीस आलं. तर कोळी यांनी दुसर्‍याचा पासवर्ड वापरल्याचेही चौकशीत समोर आलं. तसेच शाखाधिकारी व्ही. एस. सूर्यवंशी यांनी लिपीक कोळी यांच्या कामावर विश्वास ठेवून कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका चौकशी अधिकार्‍यांच्या पथकाने ठेवला आहे. या कारणामुळे शाखाधिकारी सूर्यवंशी आणि लिपीक कोळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

7 जणांवर निलंबनाची कारवाई

तासगावमधील मार्केट यार्ड शाखेत दुष्काळ निधी अपहार झाल्याचे सर्वप्रथम आढळून आलं. याप्रकरणी शाखाधिकार्‍यांसह 5 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अपहाराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मात्र अपहाराची माहिती लपविल्याबद्दल जे. एस. डोंगरे, एस. ए. कुंभार आणि यु. एन. कांबळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखा आणि सिद्धेवाडी शाखेत सुमारे 2 कोटी 43 लाख रुपयांचा दुष्काळ निधीचा अपहार झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या अपहारप्रकरणी तासगाव मार्केट यार्ड आणि सिद्धेवाडी शाखेतील आत्तापर्यंत 7 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT