Sangli DCC Bank recruitment controversy; Sadabhau Khot and Gopichand Padalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli DCC Bank : नोकरभरती स्थगितीच्या आदेशाविरोधात माजी आमदाराने दंड थोपटले, मानसिंगराव नाईकांनी थेट....

Sadabhau Khot, Gopichand Padalkar Sangli DCC Bank recruitment controversy : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सहकार विभागाने या भरतीला स्थगिती दिली आहे.

Rahul Gadkar

Sangli News : भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीनुसार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला राज्य सरकारच्या सहकार विभागाने स्थगिती दिली आहे. मात्र या स्थगिती आदेशाच्या विरोधात जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदाराने थेट न्यायालयात आव्हान दिले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून याला स्थगिती कोणत्या कारणाने दिली याबाबत स्पष्टीकरण नसल्याने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करणार असल्याची माहिती माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत स्थगिती आदेशात बँकेची केवळ निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचा उल्लेख करण्यात आला असून, भरती कोणत्या कायदेशीर तरतुदी किंवा कलमान्वये स्थगित केली आहे, याचा कोणताही उल्लेख नाही. राज्य सरकारच्या धोरणानुसार आणि शासनाच्या शासनानेच मान्यता दिलेल्या आयबीपीएस कंपनीमार्फत भरतीप्रक्रिया सुरू असल्याची माहिती माजी आमदार नाईक यांनी दिली.

भरती नेमक्या कोणत्या कारणावरून स्थगित करण्यात आली, हे आदेशात स्पष्ट केलेले नाही. सध्या रोजगाराच्या संधी मर्यादित असताना जिल्हा बँकेची भरती थांबविणे योग्य नाही. या भरतीमुळे अनेक कुटुंबांना रोजगाराची संधी मिळाली असती.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २४ जूनपासून आयबीपीएसमार्फत ४४४ कनिष्ठ लिपिक पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान विभक्ती प्रक्रिया थांबवावे अशी मागणी देखील काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या कडे केल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT