Shiv Sena vs BJP Maharashtra : ठाकरे बंधू मुंबईत एकत्र आल्याने, महायुतीमधील भाजप अन् शिवसेना पक्षाकडून राज ठाकरेंपेक्षा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहे.
सांगलीच्या जतमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली आहे. 'उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे', अशी टीका केली आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याचे बहुमत दिले होते. पण उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेस अन् राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली. हे सूर्याजी पिसाळासारखे काम उद्धव ठाकरेंनी केले". देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलले याला काडीचे महत्त्व नाही, असेही आमदार पडळकरांनी यांनी म्हटले.
'2019ला त्यांनी फडणवीसांचा घात केला. महाराष्ट्रातील जनतेने भरघोस मतदान महायुतीचे (Mahayuti) भरघोस आमदार दिले. उद्धव ठाकरेंकडून दिव्याच्या गाड्या, प्रोटोकॉल, झेड प्लस सुरक्षा सर्व गेलं आहे. काहीही राहिलं नाही? कोणी येतंय का? आता 'मातोश्री'वर आणि उध्दव ठाकरेंना भेटायला कोण जात नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे', असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. सध्या सर्व गर्दी ही भाजपकडे, एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त बनले आहेत, असेही आमदार पडळकर यांनी म्हटले.
ठाकरे बंधू तब्बल 18 ते 20 वर्षांनंतर एकत्र आले. ठाकरे बंधूंचा आवाज मराठी विजयी मेळावा पार पडला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मिठी मारत नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाली. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेही एकत्र आले होते. उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अनाजीपंत, असा केला. त्यावर प्रत्युत्तर देताना भाजप आमदाराची जीभ घसरली आहे.
उद्धव ठाकरेंनी कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणांकडे आहे. पण आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्यात जो काही आंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जतमध्ये उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.