Vishal Patil, Vishwajit Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Lok Sabha Constituency : मोठी बातमी! काँग्रेस नेते विश्वजित कदम, विशाल पाटील ‘Not Reachable’

Anil Kadam

Loksabha Election 2024 : सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाकडे गेली आणि चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले. त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली असून, विशाल पाटीलदेखील बंडखोरीच्या तयारीत आहेत. काँग्रेस समर्थकांचे विशाल पाटील ‘अपक्ष’ असे स्टेटस झळकू लागले असून, आमदार विश्वजित कदम(Vishwajeet Kadam) आणि विशाल पाटील सेनेला उमेदवारी जाहीर होताच नॉट रिचेबल झाले. काँग्रेस कमिटीसमोर विशाल पाटील समर्थनाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अंतिम बैठक मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत झाली. या बैठकीत सांगली व भिवंडी या वादग्रस्त जागेवर चर्चा करण्यात आली. मात्र, सांगलीची जागा शिवसेना व भिवंडीची जागा राष्ट्रवादीने सोडण्यास नकार दिल्याने सांगलीतून चंद्रहार पाटील यांची महाविकास आघाडीकडून(Mahavikas Aghdi) उमेदवारी जाहीर झाली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीपर्यंत प्रयत्न करूनदेखील आमदार विश्वजित कदम व इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना अपयश आले आहे. या घोषणेनंतर दोन्ही नेते नॉट रिचेबल झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस(Congress) कमिटीसमोर शुकशुकाट झाला, तर काही वेळानंतर विशाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. सांगलीच्या झालेल्या या निर्णयामुळे बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे यांना अश्रू अनावर झाले. अनेक कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखविल्या. आमच्यासाठी अत्यंत वाईट दिवस आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस रुजवण्यासाठी छातीचा कोट वसंतदादांनी केला. सगळी वस्तुस्थिती माहिती असून, जाणूनबुजून महाविकास आघाडीतील नेत्यांनी वाईट वागणूक दिली आहे. या निर्णयाचा निषेध करतो. घराघरात काँग्रेस कार्यकर्ते आहेत. आजचा निर्णय ऐकून डोळे भरून आलेत. ज्यांनी हा कार्यक्रम केला त्यांचा करेक्ट कार्यक्रम आता आम्ही करणार असल्याची भावना बोलून दाखविली.

दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीबाबत घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. सांगलीची जागा मेरिटप्रमाणे मागत होतो. बुधवारी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहे. तालुकावार कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार आहोत. विशाल पाटील अपक्ष उभे राहणार का? यावर दोन दिवसांत निर्णय होईल. अद्याप आमदार विश्वजित कदम यांच्यासोबत अद्याप बोलणे झालेले नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात शिवेसना ठाकरे गटाची ताकद नसतानादेखील त्यांनी ही जागा प्रतिष्ठेची का केली? याचे उत्तर मिळालेले नाही. महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर झाले असले तरी अद्याप काही जागांवर उमेदवार निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे भविष्यात जागा अदलाबदल होऊ शकते. भाजपच्या पराभवाची तयारी आम्ही केली आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळणे आवश्यक आहे. आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील व मी आमच्या पाच जणांची बैठक दोन दिवसांत होईल. त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल.

‘अपक्ष’ स्टेटस अन् कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू...

महाविकास आघाडीत सांगलीच्या होणार्‍या निर्णयाची प्रतीक्षा जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते करत होते. अखेर निराशाजनक निर्णय झाला, त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. सांगली काँग्रेसचीच, अस म्हणणं चुकलं का?, दादा तुम्ही फक्त लढा, ‘आमचं काय चुकलं? आता लढायचं जनतेच्या कोर्टात’, अशा पोस्ट सोशल मीडियावर पडू लागल्या आहेत. दरम्यान, विशाल पाटील समर्थकांनी सोमवारपासून अर्ज भरण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT