Nana Patole Vishal Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil: कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा..., विशाल पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?

Vishal Patil On Congress: मागील अनेक दिवसांपासून सांगली मतदारसंघावरून महाविकास आघाडीत हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस आमदार विश्वजित कदम नाराज झाले होते.

सरकारनामा ब्युरो

Sangli Lok Sabha Election 2024: मी कुठलाही नियम तोडला नाही. मला कोणताही लेखी आदेश आला नाही. वसंतदादा घराण्यामध्ये काँग्रेस आहे. कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा, आमच्या घराण्याने जे योगदान काँग्रेस (Congress) पक्षासाठी दिले आहे ते पाहावे आणि कारवाई करावी, असं वक्तव्य काँग्रेसचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून सांगली मतदारसंघावरून (Sangli Constituency) महाविकास आघाडीत हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) नाराज झाले होते. त्यांनी ही उमेदवारी काँग्रेसच्या विशाल पाटलांना द्यावी, अशी मागणी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु शेवटी ठाकरेंपुढे त्यांचं काहीही चाललं नाही. त्यामुळे ही उमेदवारी शिवसेनेला मिळाली. उमेदवारी मिळाली नाही म्हणून विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

परंतु पक्षविरोधी कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या वरिष्ठांना इशाराच दिला आहे. कारवाई करताना विचार करून करावी, असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

विशाल पाटील म्हणाले, मी कुठलाही नियम तोडला नाही. मला कोणताही लेखी आदेश आला नाही. वसंतदादा घराण्यामध्ये काँग्रेस आहे. कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा, आमच्या घराण्याने जे योगदान काँग्रेस पक्षासाठी दिले आहे ते पाहावे आणि कारवाई करावी. सांगलीच्या तीन दुष्काळी तालुक्यांचा दौरा केला.

पाण्यासाठी गावकरी कर्नाटकमध्ये जात आहेत. भाजपवर लोकांची नाराजी आहे. मला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संजय पाटील (Sanjay Patil) यांच्यावर लोकांचा रोष आहे. संजय पाटील हे भाजपकडून उभे आहेत. म्हणून त्यांना मत पडतात. कोणाचे डिपॉजिट जप्त होईल असे मी म्हणणार नाही, असं म्हणत त्यांनी दोन्ही पाटलांवर निशाणा साधला.

तसेच कालच्या कार्यक्रमाला काय झाले माहीत नाही. कार्यकर्त्यांनी सय्यम ठेवावा. पण त्यांच्या भावना आहेत. त्या उमटल्या असतील आणि घोषणाबाजी झाली असेल. विश्वजित कदम यांनी पहिल्यापासून उमेदवारी मागितली होती. परंतु काँग्रेस पक्षावर अन्याय झाला हे दुर्देैव आहे. पण पुढच्या काळात विश्वजित कदम आमचे नेते असतील, असं सूचक वक्तव्यदेखील विशाल पाटील यांनी या वेळी केलं.

निकालावेळी काकांची झोप उडेल

दरम्यान, विशाल पाटलांच्या भावाला पराभूत केले, विशाल पाटलांचा दुसऱ्यांदा पराभव करू असं वक्तव्य भाजप उमेदवार संजय पाटील यांनी केलं. यावर प्रतिक्रिया देताना विशाल पाटील म्हणाले, काकांनी चांगले स्वप्न बघावे, पण निकालावेळी त्यांची झोप उडेल, असा टोला पाटील यांनी लगावला.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT