Sangli Lok Sabha Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Lok Sabha Election : उमेदवारी अर्ज तर भरला; पण विशाल पाटलांना काँग्रेसचा एबी फॉर्म नाहीच...

Sampat Devgire

Sangli News : सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याची परिणिती म्हणजे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज केला आहे. यामुळे आघाडीपुढे ही बंडखोरी रोखायचे फार मोठे आव्हान आहे. (Latest Marathi News)

सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. या मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला होता. त्याबाबत झालेल्या चर्चेतून ठोस मार्ग निघाला नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी नाराजी पसरली होती. ही नाराजी रोखण्याचे मोठे आव्हान सध्या पक्षापुढे निर्माण झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या संदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, 'विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिलेला नाही. हा मतदारसंघ काँग्रेसला हवा होता. त्याबाबत स्थानिक पदाधिकारी विशेष आग्रहीदेखील होते. वरिष्ठ पातळीवरदेखील काँग्रेसने या जागेची मागणी केली होती. मात्र, शिवसेनेने या जागेचा आग्रह धरला. त्यामुळे सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आमची कालदेखील चर्चा झाली. यातून मार्ग निघेल याबाबत आम्ही आशावादी आहोत."

"काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना एबी फॉर्म दिलेला नाही. विशाल पाटील तसेच स्थानिक नेत्यांची आम्ही नियमित संपर्कात आहोत. याबाबत चर्चा सुरू आहे. हा संवाद कायम ठेवून सांगली मतदारसंघाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत," असेही थोरात म्हणाले.

थोरात (Balasaheb Thorat) यांनी पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रातील निवडणूक कठीण वाटत होती. ते म्हणाले, "महाराष्ट्रातील निवडणूक भारतीय जनता पक्षाला कठीण वाटत असल्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका घेतल्या आहेत. मात्र, त्याने काहीही फरक पडणार नाही. महाविकास आघाडीला अतिशय घवघवीत यश महाराष्ट्रात मिळेल. ही निवडणूक नेत्यांनी नव्हे तर जनतेने हातात घेतली आहे."

"काँग्रेस नेते (Congress) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आहेत. याविषयी थोरात यांनी वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते म्हणून चांगले काम करीत आहेत. कालदेखील ते काँग्रेसच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. त्यामुळे ते भारतीय जनता पक्षात जाणार नाहीत," असा दावा थोरात यांनी केला.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT