Sangli Commissioner Sunil Pawar Dance Pushpa Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli: अल्लू अर्जुनच्या'श्रीवल्ली’वर आयुक्त थिरकले! तरुणांना लाजवेल असा डान्स तुम्ही पाहिलात का?

Anil Kadam

Sangli: अभिनेता अल्लू अर्जुन याचा (Allu Arjun) चित्रपट ‘पुष्पा’ (Pushpa) ब्लॉक बस्टर ठरला. चित्रपटातील गाणीही तितकीच हिट झाली. विशेषतः ‘श्रीवल्ली’ (Srivalli) या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर विशेष जादू केली. इंस्टाग्रामवर ट्रेंड होत असलेल्या या गाण्यावर रील बनण्यात चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी पुढे आहेत. या गाण्यावर नृत्य करण्याचा मोह महापालिका आयुक्तांना आवरता आला नाही. आयुक्तांनी 'श्रीवल्ली’ गाण्यावरचा डान्स करीत उपस्थितांची मने जिंकली.

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त कलासंगम २०२४ या संगीतमय कार्यक्रमात आयुक्त सुनील पवार यांच्यासह उपायुक्तांनी पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर भन्नाट डान्स करत उपस्थितांची मने जिंकली. 'मै हु डॉन...' हे गाणे सादर करताच या गाण्यावर अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठेका धरत सभागृह दणाणून सोडले.

मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात कलासंगम २०२४ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नृत्य, अभिनय करून धमाल उडवून दिली.उपायुक्त स्मृती पाटील यांनी "मामाच्या गावाला जाऊ" या गीताने धमाल उडवून दिली, नकुल जकाते, स्वप्नील हेरुगडे व अन्य अधिकारी यांनी त्यांना साथ दिली.

आयुक्त पवार यांनी गझल सादर करून सर्वांची मने जिंकलीच नाही तर सभागृहाचे वातावरण बदलून टाकले. 'चांदी जैसा रंग तेरा सोने जेसे तेरे बाल ,'म्हणत आपल्या जीवन साथीदार सोबत माहोल बनविल अन् जोरदार वन्स मोअर घेतला. सुनील पवार त्यांच्या पत्नी, राहुल रोकडे व त्यांच्या पत्नी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुष्पा गीतावर धमाल उडवून दिली. विनायक जाधव यांत्रिक अभियंता यांनी 'पल पल दिल के' या गीताने बहार आणली.

दत्ता कांबळे यांनी पद घुंगरू.. या गाण्याने नगरसचिव चंद्रकांत आडके आणि नकुल जकाते यांना स्टेजवर आपली नृत्यकला दाखविण्याची संधी मिळाली. महापालिकेतील अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT