Sangli News : यंदाचं वर्ष हे निवडणुकांच्या रणधुमाळीचे आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात कायदा - सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांना सक्षमपणे पार पाडावी लागणार आहे. यामध्ये पोलिस प्रशासन कुठेही कमी पडणार नाही? असा विश्वास नव्यानेच सांगलीच्या पोलिस अधीक्षकपदी आलेले संदिप घुगे यांनी व्यक्त केला. सामान्यांच्या मनात पोलिसांबाबत चांगली प्रतिमा कशी राहिल, यादृष्टीकोनातून सर्वच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आदेशही त्यांनी दिले.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नत्तीने पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरिक्षकपदी त्यांची बदली झाली आहे. डॉ. तेली यांनी त्यांचा पदभार नवे अधिक्षक संदिप घुगे यांच्याकडे सोपविला. यावेळी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोलीस अधीक्षक संदिप घुगे म्हणाले, "डॉ. बसवराज तेली यांची प्रतिमा शांत आणि संयमी अशी आहे. त्यांच्या कार्यपध्दतीचा मला निश्चित लाभ होईल. त्यांनी जे चांगले उपक्रम सुरु ठेवले आहेत, ते यापुढील काळात देखील सुरुच राहतील. यंदाचे वर्ष विशेष महत्वाचे आहे. या वर्षी निवडणुका होणार आहेत. जिल्हा पोलिस दलाने जागरुकपणे काम करुन चांगले रिझल्ट देणे अपेक्षित आहे. कोणतीही घटना घडली तर पोलिसांनी फ्रंटलाईन वर्करची भूमिका पार पाडणे गरजेचे, असल्याचे घुगे यांनी सांगितले.
पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यावेळी म्हणाले, "सांगलीत पंधरा महिने काम करण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. राजकीयदृष्टया संवेदनशील जिल्हा म्हणून सांगलीची ओळख असली, तरी माझ्या कार्यकाळात माझ्यावर कोणाचाच राजकीय दबाव आला नाही. "
"कायद्यानुसारच काम करण्यास मी प्राधान्य दिले. काही आव्हाने आली तरी ती सहकार्याच्या सहाय्याने समर्थपणे पेलली. अजून काही दिवस सांगलीत काम करण्याची संधी मिळाली असती तर चांगले झाले असते. परंतु कृष्णेच्याकाठी काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो," असे डॉ. तेली यांनी सांगितले. या कार्यक्रमात अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक संजय मोरे, अविनाश पाटील, स.पो.नि. संदिप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नत्तीने पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरिक्षकपदी बदली झाली. त्या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. तेली यांनी, पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत असताना वयाची जाणीव होत नव्हती. परंतु आता उपमहानिरिक्षकपदी बढती मिळाल्याने विनाकारणच वय झाल्याचे वाटायला लागले असल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला. दरम्यान, सांगली जिल्ह्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये गैरसमज आहे की, हा जिल्हा काम करण्यास अवघड आहे. मात्र, असे काही नसल्याचे डॉ. तेली यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.