Sambhaji Bhide Latest Marathi News
Sambhaji Bhide Latest Marathi News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

देश चोराच्या ताब्यात ;हिंदुस्थानाला तीन बाधा झाल्यात!

सरकारनामा ब्युरो

सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मिरज येथे अनावर करण्यात आले. यावेळी संभाजी भिडे यांनी देशाला तीन बाधा झाल्या असल्याचे सांगितले. या तिन्ही बाधा वरचा तोडगा कोणता? हेही भिडे (sambhaji bhide)यांनी यावेळी सांगितले. (Sambhaji Bhide Latest Marathi News)

संभाजी भिडे म्हणाले, ''व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात खाण्या पिण्यातून अनेकांना विषबाधा होते. पण या भूत-विष बाधावर उपाय आहे. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच बाधा, दुसरी आंग्ल बाधा, तिसरी गांधी बाधा. या तिन्ही बाधावर तोडगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची उपासना आपण केली पाहिजे,''

'म्लेंच बाधा म्हणजे पाकिस्तान बांगलादेशच्या मुस्लिम समाजाच्या विचारांची बाधा, आंग्ल बाधा म्हणजे इंग्रज आपल्यावर स्वार झाले आणि त्यामुळे आलेली इंग्रजी विचारांची बाधा आणि शस्त्र विना स्वतंत्र मिळते हा विचार म्हणजे गांधी विचाराची बाधा,'या तीन बाधा हिंदुस्थानला झाल्या आहेत,' असे भिडे म्हणाले.

संभाजी भिडे म्हणाले, 'हा हिंदुस्थान चोराच्या ताब्यात आहे. हे नाश करा. त्यांना नेस्तनभूत करा. या देशावर भगव्याचे राज्य स्थापन करा. एक काशी विश्वेश्वर आपल्या शत्रूच्या ताब्यात आहे. पण छत्रपती यांची जी अपेक्षा आहे. ते पूर्ण करण्याचे काम केवळ आपल्याला करावे लागेल. कोणतीही परकीय सत्ता असली तरी त्या चीनची पकड तोडून काढली पाहिजे,'

'छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी, राष्ट्रासाठी जो त्याग केला, पण महाराजांच्या हृदयातील कण सुद्धा तुम्ही जाणत नाही.ते जाणले असते तर देशाचे चित्र वेगळे असते,' असे भिडे म्हणाले. 'या देशाला ताकत देण्यासाठी हिंदुस्थानचा सर्व समाजातील 123 कोटी जनतेचा रक्तगट बदलला पाहिजे. याचा रक्तगट शिवाजी, संभाजी केला पाहिजे, असे भिडे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT