Suresh Khade  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : आरक्षणासाठी तुम्ही काय केले ? आंदोलकांनी खाडेंना विचारला जाब; गाड्यांचा ताफा अडवला...

Mangesh Mahale

Sangli Latest News : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा, तसेच सकल मराठा समाजतर्फे विविध आंदोलन सुरू आहेत. मराठा समाजाने आता आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. गनिमी काव्याने मंत्र्यांच्या गाड्या अडवून मराठा आरक्षणासाठी काय केले हा प्रश्न विचारत आहेत.

आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा गाड्यांचा ताफा सांगलीकडून मिरजेकडे येत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करून वंड मोरे कॉर्नर येथे अडवला. त्यांना काळे झेंडे दाखवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अचानक ही घटना घडल्याने पोलिसांची धावपळ उडाली. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी गाडीतून उतरून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही काय केले? असा प्रश्न मराठा समाजाने परखडपणे खाडे यांना विचारण्यात आला.

जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मिरज तालुक्यातील राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही. जर कार्यक्रम सुरू केले तर उधळून लावू ,असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT