Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील या अध्यक्षपदी तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. पण ही सत्ता स्थापन होण्यापूर्वी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या सदस्यांनी महाविकास आघाडीला मदत केली, त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केला होता.
सांगली जिल्हा परिषदेतील कट टू कट संख्याबळ बघता आणि भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा फॉर्म्युला लक्षात घेऊन महाविकास आघाडीने सावध पावलं टाकली होती. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे सर्व सदस्य कऱ्हाडमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले होते. याच मुक्कामसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांचे अपहरण झाल्याचा आरोप माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केला.
या आरोपांनंतर पोलिसांनी कऱ्हाडच्या हॉटेलवर जाऊन राष्ट्रवादीच्या चारही सदस्यांची चौकशी केली. यात जबरदस्ती आणण्यात आले का? काही आर्थिक देवाणघेवाण झाली का? याबाबत पोलिसांनी चौकशी केली. यावर चारही सदस्यांनी आमचे अपहरण झाले नसून आम्ही पक्षाच्या आदेशानुसार आल्याचे सांगितले. मात्र सदस्य शशिकांत जमदाडे आणि विनायक मासाळ माजी खासदार संजयकाकांसोबत आले.
सहाही सदस्य सोबत येतील अशी संजयकाकांना अपेक्षा होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचा ठाम निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपचे ऑपरेशन लोटस पुरते फेल झाले. बुधवारी जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी महाविकास आघाडीचे सदस्य थेट कऱ्हाडवरून सांगली जिल्हा परिषदेत दाखल झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.