Sangli ZP Election 2026 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli ZP News: सत्तेचं गणित कुठं अडलं? सांगली जिल्हा परिषदेत ताठर भूमिकाच ठरते भाजपची डोकेदुखी

Sangli Zilla Parishad President Election: राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये भाजप विरोधात असंतोषाचे वातावरण आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपकडे असल्या तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास सध्या तरी आग्रही नाही.

Rahul Gadkar

BJP problem in Sangli Zilla Parishad: सांगली महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने घेतलेली ताठर भूमिका, घटक पक्षांना दिलेली वागणूक हीच आता सत्ता स्थापना बाबतची मोठी अडचण होत आहे. भाजपकडून सन्मानचालक वागणूक मिळत नसल्यानेच अनेकांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पर्याय शोधण्याचा विचार केला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष देखील राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचा सदस्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली खेळत आहे. मात्र राज्यस्तरावरील दबाव शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढे असल्याने सध्या तरी महायुती म्हणूनच अध्यक्ष करण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेच्या पातळीवर सुरू आहेत.

सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 18 आणि काँग्रेसकडे 11, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 1 अशा एकूण 30 जागा आहेत. दुसऱ्या बाजूला महायुतीकडेही अगदीच काठावरचं बहुमत आहे. भाजपकडे 16 राष्ट्रवादी काँग्रेस 6 आणि शिवसेनेकडे 7 जागा आहेत. रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्यकडे प्रत्येक 1 अशा 31 जागा महायुतीकडे आहेत.

मात्र जागा वाटपात भाजपकडून अहवेलनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये भाजप विरोधात असंतोषाचे वातावरण आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपकडे असल्या तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास सध्या तरी आग्रही नाही.

भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा आणि शिवसेनेच्या सात जागांचा पाठिंबा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या संदर्भात मुंबईमध्ये बैठकांची सत्र सुरू आहे. मात्र स्थानिक राजकीय संदर्भ लक्षात घेता हे दोन पक्ष कोणासोबत जाणार यावरच अध्यक्ष निवडीचा निकाल अवलंबून आहे.

महायुती की महाविकास आघाडीचे बाजूने झुकणार हे त्याचवेळी स्पष्ट होणार आहे. शनिवारी यासंदर्भात सांगलीमध्ये प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये गट नेत्यांची निवड होणार आहे. या निवडीनंतरच पाठिंबा कुणाला द्यायचा यावर निर्णय होणार आहे. जो राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मान देईल त्याला पाठिंबा देण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांची आहे, अशी माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT