zp sangli
zp sangli Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत जिल्हा बँकेचं मिटलं आता झेडपीचं घोडं अडलं!

सरकारनामा ब्युरो

सांगली : भाजपला सहकारी संस्थांच्या निवडणुकीत रस नाही इथंपासून आता भाजपने जिल्हा बँकेत अखेर पॅनेल लावले आहे. त्यामुळे आता बँकेचा विषय मिटला असला तरी जिल्हा परिषदेतील बदलांचे घोडं मात्र अडले आहे. जिल्हा परिषदेत बदलासाठी आग्रही असणाऱ्या आणि नव्याने पदाची अपेक्षा असणाऱ्या सदस्यांचे कोअर कमिटीच्या हालचालींकडे लक्ष लागले आहे.

मागच्या एका महिन्यापासून या सदस्यांना आज, उद्या असे सांगितले जात असल्याचे म्हंटले जात आहे. त्यातच आधी दिवाळीची सुट्टी आली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या घडामोडींचे कारण सांगितले होते. पण आता तेही संपले. एका बाजूला जिल्हाध्यक्ष म्हणातात 'राजीनामा आले आहेत'. तर दूसऱ्या बाजूला पदाधिकारी म्हणतात 'आम्हाला राजीनामा द्या, असे आदेशच आले नाहीत'. त्यामुळे नेमके कोण कोणाला फसवत आहे, याबाबचती चर्चा खाजगीत सुरू आहे.

दरम्यान, या बदलांसाठी आग्रही नेते खासदार संजय पाटील यांना पितृशोक झाला आहे. त्यामुळे बदलांसाठी आग्रही असलेल्या गटाची धुरा आमदार सुरेश खाडे आणि सत्यजीत देशमुख यांच्या खांद्यावर आली आहे. तर प्रदेश भाजप नेत्यांशी थेट संपर्कात असलेल्या मकरंद देशपांडे यांनी या घडामोडीत समन्वय राखण्याची धडपड चालवली आहे. जिल्हा बँकेच्या पॅनेलची बांधणी आता संपली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचा विषय संपवा, अशी आग्रही मागणी या गटाने केली आहे. त्यामुळे कोअर कमिटी निर्णय घेते की आता जिल्हा बँकेच्या प्रचाराचे कारण पुढे करते, याकडे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT