Election team conducts on-camera raid at Shiv Sena leader Shahajibapu Patil’s office ahead of Sangola polls. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola : सांगोल्यात शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावर LBC ची धाड : भाजप-शेकापचीही झाडाझडती

Sangola : सांगोला नगरपरिषद निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर गुन्हे शाखा आणि निवडणूक आयोगाने धाड टाकली. भाजप आणि शेकाप कार्यालयांचीही झाडाझडती घेतली.

Hrishikesh Nalagune

Shahajibapu Patil : सांगोला नगरपरिषदेसाठी मंगळवारी (2 डिसेंबर) मतदान होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर स्थानिक गुन्हे शाखा आणि निवडणूक आयोगाने धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. तपास पथकाने कार्यालयाची ऑन कॅमेरा झाडाझडती घेतली. पथकाने भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालायची देखील ऑन कॅमेरा झडती घेतली.

रविवारी (30 नोव्हेंबर) दुपारी सांगोला येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यात त्यांनी शिवसेना किंवा शहाजीबापू पाटील यांच्यावर कोणतीही टीका केली नाही. पण शेकाप-भाजप युतीचा आनंद त्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी संध्याकाळी शहाजीबापू पाटील यांचीही मोठी सभा झाली. याच सभेनंतर भरारी पथकांनी शहाजीबापू पाटील, भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात धाड टाकली.

या संपूर्ण धाड सत्रात काय सापडले याची माहिती अद्याप आयोगाने दिलेली नाही. मात्र धाडीनंतर राजकीय टीका सुरु झाल्या. शहाजीबापू पाटील वाघ आहे, कारवाईला घाबरणारा नाही. यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी षडयंत्र रचून धाड टाकायला लावल्याचा आरोप पाटील यांनी केला. तर व्यक्ती सत्ताधारी पक्षात हे की विरोधात आहे यावर धाड ठरत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT