Sanjay Mandlik, Hasan Mushrif Samarjit Ghatge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Mandlik News: एकाकी पडलेल्या मंडलिकांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले,'कोणाला वाड्यावरचं आरक्षण उठवायचं तर एकाला ईडीची...'

Kolhapur Election 2025 : कागल नगरपालिकेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी मुश्रीफ-घाटगे एकत्र आल्यानंतर शिवसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडल्याचे चित्र होते. तर बुधवारी कागल नगरपालिकेचा पहिला निकाल हाती आला.

Rahul Gadkar

Kagal News: कागल नगरपालिकेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी मुश्रीफ-घाटगे एकत्र आल्यानंतर शिवसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडल्याचे चित्र होते. तर बुधवारी कागल नगरपालिकेचा पहिला निकाल हाती आला. त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुतणे नवाज मुश्रीफ यांच्या पत्नी सेहरनिदा मुश्रीफ बिनविरोध झाल्या. त्यामुळे आणखी राजकीय खळबळ उडाली. त्यावर आता माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी भाष्य करत घाटगे-मुश्रीफ यांच्या युतीचे खरे कारण समोर आणत धक्कादायक गौप्यस्फ़ोट केला आहे.

माजी खासदार संजय मंडलिक यावेळी म्हणाले, दोघांच्या युतीचे कारण हे कोणत्याही विकास कामाचा मुद्दा नाही. एका नेत्याची प्रॉपर्टी अडकलेली आहे. आणि दुसऱ्या नेता हा ईडीमध्ये अडकलेला आहे. कागलमधील जुन्या वाड्यावरील आरक्षण एका नेत्याला उठवायचे आहे. तर एका नेत्याला ईडीमधून मुक्तता हवी आहे. यातून सुटका होण्यासाठीच समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी युती केली असल्याचा गौप्यस्फ़ोट मंडलिक यांनी केला.

पुढे म्हणाल, कागल नगरपालिकेमध्ये आम्ही 23 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. खबरदारी म्हणून आम्ही हे सर्व उमेदवार अज्ञात स्थळी पाठवले आहेत. उमेदवारांवर दबाव आणि दादागिरी होऊ शकते, प्रसंग पडल्यास आर्थिक अमिषं देखील दाखवली जाऊ शकतात. म्हणून खबरदारी घेतलेली आहे. मुळात दोघांची युती ही जनतेला पटलेली नाही. त्यामुळे जनतेचा कौल आम्हाला मिळेल, असा विश्वास मंडलिक यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक नऊमधून आम्ही एक 22 वर्षीय महिला उमेदवार रिंगणात उतरवली होती. खबरदारी म्हणून आपण बाहेर जाणार असल्याची माहिती त्यांना आम्ही दिली होती. कपडे आणण्यासाठी ती कागलमधील घरी गेली असताना त्या ठिकाणी आर्थिक आमिषं दाखवली. त्यातून ही माघार झाली. या दोघांच्या युतीमुळे मला जनतेचा कौल मिळणार आहे. यांच्यामुळे मला एकटा पाडला, एकाकी पडलो असं म्हटले जाऊ लागले आहे. पण याचमुळे मला ताकद मिळाली आहे.

स्वर्गीय मंडलिकसाहेब देखील 2009 च्या निवडणुकीत अपक्ष उभे राहिले होते. त्यावेळी सर्व लोक त्यांना एकट पडले म्हणत होते. मात्र जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिला हा कागल चा इतिहास आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा कागल मध्ये येईल. असेही मंडलिक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT