Sanjay Shirsat and Gulabrao Patil On Sanjay Raut sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Shirsat : 'म्हशीचा की रेड्याचा बळी!', राऊतांच्या टीकेवर संजय शिरसाटांसह गुलाबराव पाटीलही तुटून पडले

Sanjay Shirsat and Gulabrao Patil On Sanjay Raut : राज्यातील सत्तांतर होत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या इतर आमदारांनी गुवाहाटीच्या दौऱ्यात काय केलं यावर संजय राऊतांनी गौप्यस्फोट केला होता. ज्यावरून राज्याचे राजकारण पुन्हा तापलं होतं.

Aslam Shanedivan

Sangli News : सत्तांतरावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुवाहाटी आणि तेथील कामाख्या देवीच्या मंदिरात गेले होते. त्या दौऱ्यादरम्यान शिंदेंनी रेड्याचा बळी दिल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक सदरात केला. त्यावरून आता राज्यातील राजकारण चांगला तापलं आहे. तर संजय राऊतांचा हा दावा शिवसेना शिंदे गटाच्या जिव्हारी लागला असून मंत्री संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर तुटून पडत जोरदार टीका केली आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राऊत यांना या टीकेवरून टोला लगावताना बळी म्हशीचा की रेड्याचा दिला यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले? हे पाहिलं असतं तर आज किमान पक्ष टिकला असता असा टोला शिरसाट यांनी राऊत यांना लगावला आहे. ते सांगली मिरज येथील मागासवर्गीय वस्ती गृहाच्या उदघाटना प्रसंगी बोलत होते.

यावेळी शिरसाट यांनी, आम्ही म्हशीचा बळी दिला का? रेड्याचा? हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले? याचा विचार राऊतांसह ठाकरेंनी करायला हवा होता. तसा विचार केला असता तर आज पक्षात काही आमदार खासदार उरले असते. आम्ही कामाख्या देवीला गेलो, हा आमचा पिक्चर सर्व जगाने पाहिला आहे. त्या ठिकाणी म्हशीचा का रेड्याचा बळी दिला. हे पाहायला संजय राऊत कुठून आला होता. हे आम्हाला माहित नाही.

पण तो मूर्खासारखा बडबडतो आणि पश्चाताप करण्यापेक्षा टीका करण्यामध्ये धन्यता मानतो. त्यामुळे आज देखील उबाठा मधून आउटगोइंग सुरूच आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांनी बडबड तशीच सुरू ठेवावी, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. पहलगाममधील हल्लावरून देखील राऊत यांनी टीका केली होती. त्यावरही शिरसाट म्हणाले. ही मूर्खता आहे, संजय राऊत पहलगाम हल्ला झाला त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी बदला घेतला. पण याचा पोटसूळ यांना का? राऊत पाकिस्तानचे गुलाम आहात का? आशा शब्दात शिरसाट यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.

दरम्यान धुळे दौऱ्यावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देताना पलटवार केला आहे. जळगावमध्ये पाटील यांनी, गुवाहाटी येथे मोठ्या प्रमाणात प्राण्याची कट्टर करून बळी दिले आहेत अशी टीका सामनातून संजय राऊत यांनी केलीय. मग गुवाहाटीत स्वतः ते त्या ठिकाणी बळी देण्यासाठी उपस्थित होते का? असा सवाल उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे राऊतांनी?

मुखपत्र ‘सामना’तील रोखठोक सदरात खासदार संजय राऊत यांनी शंखनाद ते रेड्याची शिंगे या मथळ्याखाली गुवाहाटी दौऱ्याबद्दल लिहलं आहे. ‘शिंदे आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी होतो. राज्याच्या मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावलं होतं. त्याची आठवण गाभाऱ्यातील पांडा म्हणजेच पुजारी लोकांनी माझ्याकडे काढली’, असं त्यांनी लिहिलंय. त्यावरून आता नव्याने राजकारण सुरू झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT