BJP MP Sanjay Patil
BJP MP Sanjay Patil  
पश्चिम महाराष्ट्र

मी भाजपचा खासदार, माझ्यामागे ईडीची पिडा नाही

सरकारनामा ब्युरो

सांगली : ' मी भाजपचा खासदार (BJP MP) आहे त्यामुळे सक्तवसुली संचलनालय (ED) माझ्यामागे लागणार नाही,' असे खळबळजनक वक्तव्य सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी केले. सांगलीच्या विटा येथे आयोजित विविध विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने आता राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

''लोकांसमोर आम्हाला दिखावा करावा लागतो. दिखाव्यासाठी कर्ज काढून आम्हाला ४० लाखाच्या गाड्या वापराव्या लागतात. आमचं कर्ज पाहून ईडीवालेही चक्रावून जातील, आता याचं रेकॉर्डिंग आलं तरी अडचण नाही, असंही त्यांनी म्हटलं. तसेच, आम्ही राजकारणी माणसं गरज नसताना कर्ज काढतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असेही संजयपाटील म्हणाले.

केंद्रातील मोदी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या मागे इडी, सीबीआय, आयकर विभागाचे धाडसत्र, चौकश्या, तपास सुरु आहेत. पण जर चौकशी सुरु असलेला कोणी नेता भाजपात गेला तर त्याला अभय मिळते, असे आरोप अनेकदा राज्यसरकारने केले आहेत. अशातच संजय पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यांमुळे विरोधकांच्या दाव्याला पुष्टीच मिळाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधून भाजपात गेलेले हर्षवर्धन पाटील यांनीही असंच वक्तव्य केलं होतं. मावळमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही...' असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT