Jayant Patil, Sanjaykaka Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjaykaka Patil News : संजयकाकांची नवीन भविष्यवाणी ; म्हणाले, 'जयंत पाटील लवकरच भाजपप्रवेश करणार'

सरकारनामा ब्यूरो

Sangli : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (शरद पवार गट) भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा अनेक दिवसापासून आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत सांगलीत सूचक विधान केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

"भाजपाच्या होकायंत्रांचा इशारा असून लवकरच जयंत पाटलांचा प्रवेश होईल," अशा शब्दात खासदार संजयकाकांनी जयंतरावांच्या भाजप प्रवेशाचे सुतोवाच केले आहे.

महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवार गटात दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटील कुठे जाणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. "जयंत पाटलांचा भाजपा प्रवेश होईल," असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते.

काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला होता “जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,” असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं होतं.

त्यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली होती. "संजय शिरसाटांपेक्षा माझी क्रेडिबिलिटी (विश्वासार्हता) जरा जास्त असेल नाही का? त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी प्रतिक्रिया घेणं म्हणजे जरा जास्तच झालं," असे ते म्हणाले होते.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT