Ramraje Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramraje Naik Nimbalkar : फलटणमध्ये अजितदादांनी जाहीर केलेला उमेदवार अन् राजे गट करणार 'सीमोल्लंघन'; रामराजेंचं काय?

Ramraje Naik Nimbalkar On Sharad Pawar : अनेक दिवस रामराजे-नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण हे राष्ट्रवादीत ( शरदचंद्र पवार ) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

Akshay Sabale

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी फलटणमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि संपूर्ण राजे गट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची साथ सोडणार आहे. ते 14 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘तुतारी’ हाती घेण्याचं ठरलं आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे मात्र ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

अनेक दिवस रामराजे-नाईक निंबाळकर ( Ramraje Naik Nimbalkar ) आणि आमदार दीपक चव्हाण हे राष्ट्रवादीत ( शरदचंद्र पवार ) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. महायुतीत असताना सुद्धा भाजपच्या नेतेमंडळींकडून ( माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे ) होत असलेली अडवणूक आणि कार्यकर्त्यांना मिळत नसलेला सन्मानामुळे पक्ष बदल करण्याचा दबाव कार्यकर्त्यांकडून नेतेमंडळीवर होता.

शरद पवारांनी दिलेली संकेत

कार्यकर्त्यांच्या मनातील भावना रामराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या कानावर घालून न्याय देण्याची मागणीसुद्धा केली होती. पण, दुर्लक्ष होत असल्यानं रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी तातडीची बैठक झाली. तेव्हा, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी 14 नोव्हेंबरला 'तुतारी’ हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला. याचे संकेत शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी दिले होते.

अजितदादांनी दीपक चव्हाणांनी उमेदवारी जाहीर केलेली....

महायुतीचं तिकीट वाटप अद्याप जाहीर झालं नाही. मात्र, फलटणमधून दीपक चव्हाण यांची उमेदवारी अजिततदादा यांनी फोनवरून जाहीर केली होती. पण, विधानसभेपूर्वीची अजितदादांना फलटणमध्ये धक्का बसला आहे.  

महायुतीचा प्रचार करणार नाही...

रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “त्या दोन महनीय व्यक्तींमुळे हा निर्णय घ्यावा लागतो. जोपर्यंत त्या दोन व्यक्तींच्या हातात भाजपचा निर्णय आहे, तोपर्यंत फलटण तालुक्यात भाजपबरोबर राहू शकत नाही. त्यांच्यामुळे महायुतीचा प्रयोग सातारा जिल्ह्यात होऊ शकत नाही. कार्यकर्त्यांचे रक्षण करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. मी मनानं तुमच्यासोबत आहे. प्रचार मी करणार नाही,” असं रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिपदापेक्षा तालुक्याचे हित पाहिले...

“1991 मध्ये विकासासाठी आम्ही तिथे भाऊ एकत्रित राजकारणात आलो. कार्यकर्त्यांचा हितासाठी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता जनतेचा निर्णय सर्वोच्च मानला आहे. कार्यकर्त्यांच्या निर्णयाला माझा विरोध नाही. अजितदादा कामाचे नेते आहेत. मी मंत्री पदापेक्षा तालुक्याचे हित पाहिले,” असं रामराजे नाईक-निंबाळकर यांनी म्हटलं.

आपण कार्यकर्त्यांना बांधील दुसऱ्या कोणाला नाही...

संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, “कार्यकर्त्यांना त्रास होणार असेल आणि घटक पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांची पाठराखण करत असतील, तर महायुतीत कशाला राहायचं? त्यापेक्षा समोरासमोर लढू.  कार्यकर्त्यांचे व त्यांच्या समर्थकांचेही म्हणणे तुतारीचेच आहे. दादासमोर आपण व्यथा मांडल्या, परिणाम काहीच झालं नाही. आपल्यातून गेलेल्या कार्यकर्त्याला त्यांच्या वरिष्ठांनी पद दिलं. तरीही आपण गप्पच राहिलो, तर कार्यकर्त्यांचा आपल्यावर विश्वास राहणार नाही. आता काय व्हायचं ते होईल, निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना निदान ठाम भूमिका उघडपणे घेता येईल. प्रसंगी रस्त्यावर उतरू. आपण कार्यकर्त्यांना बांधील आहोत. दुसऱ्या कुणाला नाही. खरंतर शरद पवार यांच्यामुळेच रामराजेंना व आपल्याला ताकद मिळाली. बरंच काही मिळालं. अजितदादांनीही आपली काम केलीत. रामराजे आता कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर आपणाला करावाच लागेल.

मग सत्तेत का राहायचं?

“कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून येतो. या कार्यकर्त्यांचंच खच्चीकरण होणार असेल तर त्याचा काय उपयोग? महायुतीतील घटक पक्षाकडून कार्यकर्त्यांच्या सन्मानाची नुसतीच आश्वासन मिळतात. कृती काहीच नाही. मग सत्तेत का राहायचं? जनतेने घेतलेला निर्णय मान्य आहे,” असं आमदार दीपक चव्हाण यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT