Ajit Pawar Shard Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ncp Politics : बडा नेता शरद पवारांची सोडणार साथ, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी?

Sanjiwaraje Naik Nimbalkar Likely to Join Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत महायुतीने पुन्हा सत्ता मिळवली त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेलेले नेते पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत.

Roshan More

Ncp Politics : लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग झाले होते. अजित पवारांची साथ सोडून अनेक जण शरद पवार यांच्यासोबत आले होते. त्यामध्ये फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे, मुलगा अनिकेत राजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने पुन्हा सत्ता मिळवली त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेलेले नेते पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामध्ये फलटमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा अजित पवारांना साथ देणार असल्याची माहिती आहे.

संजीवराजे यांच्यासोबत रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे आणि विश्वजितराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

संजीवराजे हे आधीच भेटून गेले आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच होईल. राष्ट्रवादीमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत इन्कमिंग होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीतच

रामराजे यांचे संजीवराजे हे चुलत बंधू आहेत. रामराजेंच्या वतीने संजीवराजे हे फलटण राजकारण संभाळतात. भाजपचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना कंटाळून संजीवराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. रामराजे यांच्या पाठींब्यानेच हा प्रवेश झाला होता. या प्रवेशाला परवानगी देताना रामराजे मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT