Saraswati Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

चंद्रकांत पाटील यांच्या आई सरस्वती पाटील यांचे कोल्हापुरात निधन

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज (ता. २४ जुलै) कोल्हापूर (Kolhapur) येथील निवास स्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली व परिवार आहे. (Saraswati Patil passed away)

आमदार चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, सरस्वती पाटील यांच्या पार्थिवावर आज (ता. २४ जुलै) रात्रीच साडेआठच्या सुमारास कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझी आई सरस्वती (वय ९१) आज देवाघरी गेली. वृद्धापकाळामुळे प्रकृती खाली-वर होत होतीच. प्रतिकूल परिस्थितीतही संसार करताना आईने आम्हा भावंडांवर स्वाभिमान आणि मेहनतीनं जगायचे संस्कार केले. या शिदोरीवरच माझी आयुष्यभर वाटचाल झाली आहे. आई, देवाघरूनही तुझं आमच्यावर लक्ष असेलच..ओम शांती!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT