Shahaji Bapu Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil : शहाजीबापूंविरोधात सांगोल्यात सरपंच आक्रमक; नक्की चाललयं काय?

सांगोला तालुक्यातील 45 गावातील सरपंचांनी थेट सोलापूर जिल्हा परिषदेला धडक दिली

अनुराधा धावडे

Shahaji bapu Patil News : आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात सांगोल्यातील राजकीय वर्तुळात नाराजीचा सुरु उमटत असल्याची माहिती समोर आली आहे. शेकापचे नेते चंद्रकांत देशमुख व बाबा करांडे यांच्यासह मंगळवारी (२४ जानेवारी) सांगोला तालुक्यातील 45 गावातील सरपंचांनी थेट सोलापूर जिल्हा परिषदेला धडक देत अधिकाऱ्यांना गावातील विकास कामामधील आमदारांच्या हस्तक्षेपावरुन संताप व्यक्त केला.

शहाजी बापू पाटील यांच्या मतदार संघातील शेकाप पक्षाच्या 45 गावातील सरपंचांनी काल (२४ जानेवारी) सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांचीही भेट घेतली. दलित वस्ती सुधारणासाठी निधी मिळत नसल्याने 45 गावांचा विकास थांबला आहे. गावांमधील दलित वस्तीच्या सुधाराणांसाठी जिल्हा प्रशासनकडून समान निधी मिळत नाही, अशी खंत या ४५ गावातील सरपंचांनी व्यक्त केली.

आमच्या कामात आमदारांचा हस्तक्षेप कसा करु शकतात, दलित वस्तीच्या कामांचा आणि आमदारांचा काय संबंध असे सवाल उपस्थित करत सरपंचांनी थेट अधिकाऱ्यांनाच धारेवर धरलं. तसेच, ग्रामपंचायतींनी केलेला ठराव आमदार ग्राह्य धरत नाहीत अशी तक्रारही यावेळी सरपंचांनी केली. यावेळी सरपंचांनी त्यांनी दिलेल्या कामकाजाची यादी ग्राह्य धरली जावी अशी मागणी सरपंचांकडून करण्यात आली. यावेळी संदीप कोहीनकर यांनी समाजकल्याण अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT