Dudhani Bazar Samiti Sabhapati-upsabhapati Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dudhani Bazar Samiti : म्हेत्रेंच्या गडात प्रथमच भाजपचा सभापती : दुधनी बाजार समितीच्या सभापतिपदी सातलिंगप्पा परमशेट्टी

आमदार कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने सोसायटी मतदारसंघात, तर म्हेत्रे यांच्या पॅनलने व्यापारी, हमाल तोलार व ग्रामपंचायत मतदारसंघात विजय मिळविला.

चेतन जाधव

अक्कलकोट (जि. सोलापूर) : बहुचर्चित दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भारतीय जनता पक्षाचे (BJP) दुधनीचे शहराध्यक्ष सातलिंगप्पा परमशेट्टी यांची, तर उपसभापतिपदी बोरीउमरगे येथील सिद्धाराम बाके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बाके यांना सलग दुसऱ्यांदा उपसभापती म्हणून संधी मिळाली आहे. नूतन पदाधिकारी व संचालकांचा आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. काँग्रेसच्या म्हेत्रेंच्या गडात आमदार कल्याणशेट्टी यांनी बाजी मारत प्रथमच भाजपचा सभापती केला आहे. (Satalingappa Paramshetti as Chairman of Dudhani Bazar Samiti)

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) सभापती व उपसभापती निवडीसाठी बाजार समितीच्या कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. सभापतिपदासाठी सातलिंगप्पा परमशेट्टी, तर उपसभापतिपदासाठी सिद्धाराम बाके यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक (Election) अतिशय चुरशीने दोन्ही पक्षांनी लढवली होती.

माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam mhetre) आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या पॅनेलविरोधात आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti), माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पॅनेलमध्ये लढत झाली. अतिशय प्रतिष्ठेच्या या लढाईत भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बाजी मारली. बाजारा समितीच्या १८ पैकी १२ जागा जिंकून बहुमत मिळविले होते.

निवडणुकीच्या दरम्यान व्यापारी मतदारसंघातील दोन जागा बिनविरोध जिंकत म्हेत्रे गटाने खाते उघडले होते. उर्वरित १६ संचालकापैकी १२ जागा आमदार कल्याणशेट्टी यांनी जिंकून ऐतिहासिक विजय मिळविला होता. आमदार कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने सोसायटी मतदारसंघात, तर म्हेत्रे यांच्या पॅनलने व्यापारी, हमाल तोलार व ग्रामपंचायत मतदारसंघात विजय मिळविला.

नूतन निवडी प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील,सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, महेश पाटील दुधनी, लक्ष्मीपुत्र पाटील दुधनी, गोपीनाथ मेळकुंदे, विवेकानंद उंबरजे, राजू झिंगाडे, आप्पासाहेब पाटील चपळगाव, मल्लिकार्जुन आळगी, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शिरवळचे,अप्पू बिराजदार, परमेश्वर यादवाड,महादेव मुडवे केगाव,सुरेश नागुर मैंदर्गी,महादेव पाटील रूद्देवाडी,परमेश्वर झळकी, ज्योती उन्नद,सुरेखा होळीकट्टी,मायावती दुधनीकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रात आदर्श निर्माण करा : कल्याणशेट्टी

सभापती, उपसभापती निवडीनंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील विजय ऐतिहासिक आहे. मात्र, नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळांनी शेतकरी, व्यापारी, हमाल तोलार यांचे हित जोपासले पाहिजे. पारदर्शक कारभार करून महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT