Vikram Pawar, Madhukar Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara APMC : सभापतीपदी विक्रम पवार, उपसभापतीपदी मधुकर पवार; बिनविरोध निवडी

Satara APMC सातारा बाजार समितीत आज सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबंधक शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

Umesh Bambare-Patil

Satara APMC News : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विक्रम लालासाहेब पवार (पापा) यांची तर उपसभापती पदी मधुकर पवार यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीची खिंडवाडी येथील जागेचा तिढा खासदार उदयनराजेंचा विरोध मोडीत काढून यशस्वीरित्या सोडविल्याबद्दल विक्रम पवार यांना सभापती पदाचे दुसऱ्यांदा बक्षिस मिळाले आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव पाटील यांनी अभिनंदन करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

सातारा बाजार समितीत Satara APMC आज सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबंधक शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाले. त्यामुळे सर्वानुमते विक्रम पवार Vikram Pawar यांची सभापतीपदी तर मधुकर पवार Madhukar Pawar यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनी जाहीर केले.

यानंतर फटक्याची आतषबाजी करत दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. यानंतर विक्रम पवार व मधुकर पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सर्व संचालकांच्यावतीने शंकर पाटी यांनी सत्कार केला. यावेळी सर्व संचालक तसेच अधिकारी व सचिव रघुनाथ मनवे उपस्थित होते.

खिंडवाडीत सुसज्ज मार्केट कमिटी उभारणार

सभापती विक्रम पवार म्हणाले, खिंडवाडी येथील १७ एकर जमिनीवर सुसज्ज अद्यावत अशी मार्केट कमिटीची निर्मिती लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच हमाल बांधवांसाठी हमाल भवन बांधणार असून कै.भाऊसाहेब महाराज यांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. आमचे नेते व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दुसऱ्यांदा सभापती होण्याची संधी दिली त्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो.

निष्ठेचे फळ मिळाले...

उपसभापती मधुकर पवार म्हणाले, बाबाराजे यांच्यावर निष्ठा ठेवली, त्याचे फळ आम्हाला या पदाच्या रुपाने मिळाले आहे. आगामी काळात बाजार समितीत सर्वांच्या विचाराने कार्यरत राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT