Satara, 01 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीसाठी आज (ता. 01 नोव्हेंबर) मतदान होत आहे. सोसायटी मतदारसंघात बहुतांश ठिकाणी काट्याची लढाई सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कट्टर राजकीय विरोधक असलेल्या नेत्यांमध्ये अनेक वर्षांनंतर संवाद घडताना दिसून आला आहे. असाच संवाद फलटणमधील एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात आज मतदानाच्या वेळी घडला. त्याची जिल्हाभर चर्चा होताना दिसत आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतदान प्रक्रियेत सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत फलटण तालुक्यात होत आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यात सोसायटी गटात निवडणूक होत आहे.
फलटणच्या राजकारणात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. एकमेकांवर टीका करायची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नाहीत. मात्र, आजच्या दोघांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे जिल्हा बॅंकेसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी फलटण येथील मतदान केंद्रावर आले होते. त्या वेळी त्यांच्या स्वागतासाठी संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होतेच. मात्र, रामराजेंचे कट्टर विरोधक रणजितसिंह नाईक निंबाळकरही उपस्थित होते.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी चक्क रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या खांद्यावर हात ठेवत समोरासमोर येऊन संवाद साधला. रामराजे यांनी गाडीतून खाली उतरताच जाऊ का परवानगीने आत, अशी गुगली टाकली. त्यावर रणजितसिंहांच्या शेजारी उभे असलेले एका नेत्याने मतदार शेवट गंडतंय का, असं संजीवराजेंना विचारत होतो. त्यावर संजीवराजेंनी जमतंय बघा, असे सांगितले.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही ‘मतदान गंडतंय का बघा’ असा सल्ला दिला. त्यावर रामराजेंनी रणजितसिंहांशी हस्तांदोलन करत तुम्ही गंडवू शकता. हे नाहीत, असे उत्तर रणजितसिंह आणि त्याच्या समर्थकाला दिले. ही भेट आणि त्यावेळी झालेल्या संवादाची सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातून विस्तवही जात नाही. मात्र, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठरावधारकांचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याच्या व्यासपीठावर गोरे आणि रामराजे यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.