Sharad Pawar - Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar News : तीन टप्प्यांनी केले मोदींना अस्वस्थ; आता त्यांचा टोन बदलला, पवारांची टीका !

Umesh Bambare-Patil

Satara NCP News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता राज्यातील विविध भागात फिरण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये भाजपच्या महायुतीला मिळत असलेला प्रतिसाद फारसा मिळत नसल्याचे शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडत त्यांचा बुरखा फाडण्यास सुरूवात केली आहे.

मोदींना मतदारांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने मोदी अस्वस्थ झाले आहेत. त्यांचा भाषणाचा टोन बदलला असून आता ते थेट मुस्लिम समाजाचा उल्लेख करत आहेत. धर्मांधवादी विचारांना घेऊनच काहीतरी बदल होईल, अशी त्यांच्या मनात शंका असावी. जसजसे टप्पे पुढे जातील तसतसे त्यांचे स्थान सरकत चालले आहे,अशी भावना त्यांच्या समर्थकांत आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. ते साताऱ्यामध्ये बोलत होते.

शरद पवार हे गुरूवारी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी सातारा राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील पहिल्या तीन टप्प्यात झालेले मतदान पंतप्रधान मोदींना अस्वस्थ करणारे आहे. मोदींचे स्थान सरकतच चालले आहे, अशी भावना भाजपच्या नेत्यांमध्ये आहे. महाराष्ट्रात मतदानाचे तीन टप्पे झाले, यामध्ये कमी मतदान झाले आहे, यावर शरद पवार म्हणाले, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ करणारे असे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींनी आपल्या प्रचाराचा आणि भाषणांचा टोन बदलला आहे. आता ते थेट मुस्लिम (Muslim) समाजाचा उल्लेख करत आहेत. धर्मांधवादी विचार घेऊनच काहीतरी बदल होईल,अशी शंका त्यांच्या मनात असावी.जसे मतदानाचे टप्पे पुढे जातील तसे त्यांचे स्थान सरकतच चालले आहे, अशी भावना मोदी यांच्या समर्थकांमध्ये आहे, असे पवार म्हणाले. इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार असल्याबाबत पवार यांना विचारले असता, याबाबत मी तुमच्याकडूनच ऐकले आहे. ईव्हीएम संदर्भात काही तरी माहिती त्यांना हवी असेल त्याशिवाय ते राष्ट्रपतींना भेटणार नाहीत, असेही शरद पवार म्हणाले.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने सोडला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असून यापैकी 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निश्चय भाजपच्या नेत्यांनी केला आहे. महाराष्ट्रात यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जात आहे. महायुतीला अधिकाधिक जागांवर विजय मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: यामध्ये लक्ष घालत असून विविध भागात जाहीर सभा घेत आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT