Satara News : Mahesh Shinde : Shambhuraj Desai
Satara News : Mahesh Shinde : Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : "पाटण, कोरेगावातील गद्दारांना गाडा.."

सरकारनामा ब्यूरो

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यासारखी सध्या शिवसेनेची अवस्था झाली असून,या किल्लयाने अनेक घाव झेलले आहेत. छत्रपतींचे येथील वंशज सध्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर नाही. प्रतापसिंह महाराज कधीही विरोधकांपुढे झुकले नाहीत. पण, त्यांच्या वंशजांनी भाजपाशी तडजोडी केली आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच आगामी निवडणूकीत पाटण आणि कोरेगावातील गद्दारांना गाडून टाका, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवगर्जना मेळावा आज साताऱ्यातील पालिकेच्या शाहू कलामंदीरात झाला. लक्ष्मण हाके, जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, संजय भोसले, हर्षद कदम, बाबुराव माने, हणमंत चवरे, आदींची प्रमुख उपस्थित होते.

या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारसह भाजप, मोदी, शहांसह पालकमंत्री शंभूराज देसाईवर टीकेची झोड उठवली. राऊत म्हणाले, "मला माफी मागण्याची सवयी नाही,कारण मी कोंणाच्या बापाला घाबरत नाही. शिवसेना संपली म्हणतात तीच शिवसेना आज आम्ही रस्त्यावर पहात आहोत. आता ही शिवसेना धगधगत्या मशालीचे अग्नीकुंड झाले आहे. सध्या शिवसेनेची अवस्था अजिंक्यतारा किल्ल्यासारखी झाली आहे. या किल्ल्यान छातीवर आणि पाठीवर अनेक घाव झेलले आहेत. आता शिवसेना गद्दारीचे घाव झेलत आहे. तरीही आमची शिवसेना टिकून आहे. पण कितीही काही झाले तरी शिवसेनेची बस कधीही रिकामी राहिली नाही. कायम हाऊसफुल राहिली आहे. "

शंभूराज देसाइईंवर टीकेची झोड उठवताना राऊत म्हणाले, " पाटणचे पापाचे पित्तर शंभू की चंभु... शिवसेना नसती तर त्यांना मंत्री पदही मिळाले नसते. त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले व शिवसेनेला ताकत दिली. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणे काम चालू होते. त्यावेळी या भागातील काँग्रेस नेत्यांनी शिवसेना वाढली पाहिजे अशी भूमिका घेतली. पण ही कालची कार्टी शिवसेना संपवायला निघाली आहेत."

"महाराष्ट्र मोदी, शहापुढे कधीही झुकणार नाही आणि वाकणारही नाही. निवडणूक आयोग बेकायदेशीर आहे असून, या आयोगाला चुना मळत बसायला लावणार आहोत. आगामी काळात दिल्ली आणि महाराष्ट्र भगव्याचे राज्य येणार आहे. "

ते पुढे म्हणाले, "छत्रपतींचे वंशज आज ज्या पक्ष्यात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर नाही. सातारचे प्रतापसिंह महाराज कधी झुकले नाहीत. पण, त्यांच्या वंशजांनी भाजपाशी तडजोडी केली. २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी पाटण व कोरेगावातील गद्दारांना गाडावे."

यावेळी बाबूराव माने, लक्ष्मण हाके, सचिन मोहिते आदींची भाषणे झाली. संजय राऊत यांचे आगमन होताच वाघ आला रे वाघ आला शिवसेनचा वाघ आला अशी घोषणाबाजी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT