Satara Politics: राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुकींसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानापूर्वी आदल्या दिवशी साताऱ्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.
दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे शाब्दीक युद्ध संपल्यानंतर त्यांचे पर्यावसन हाणामारीत झाली. यामुळे साताऱ्यात काही काळ तणावाचे वातावरण होते. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील राजकीय वाद या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला भाजपच्या उमेदवाराच्या भावाने मारहाण केल्याने साताऱ्यात जिल्हा परिषद निवडूक प्रचाराला गालबोट लागले आहे. साताऱ्यातील पाल जिल्हा परिषद गटातील ही घटना घडली. या प्रकरणी राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत. या घटनेमुळे साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाबासाहेब चोरेकर यांचे नातू बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना भाजपचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने मारहाण केली. देवदर्शनाहून परतताना ही मारहाण करण्यात आली. पाल जिल्हा परिषद गटात भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील राजकीय गटात कलगीतुरा रंगला आहे.
या घटनेनंतर बाळासाहेब साळुंखे चोरेकर हे तक्रार दाखल करण्यासाठी उंब्रज पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाले आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना रस्त्यामध्ये अडवून मारहाण करण्यात आली. कपडे फाटेपर्यंत त्यांना मारल्याचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमावरुन समोर आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.