Satara Zilla Parishad
Satara Zilla Parishad sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सातारा झेडपीचे सीईओ गौडा दांपत्याला कोरोनाची लागण

सरकारनामा ब्युरो

सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि त्‍यांच्‍या पत्‍नीस कोरोनाची बाधा झाल्‍याचे शुक्रवारी समोर आले. श्री. गौडा कोरोनाबाधित आल्‍याने जिल्‍हा परिषदेतील कर्मचाऱ्यां‍त धास्‍ती वाढली असून, त्‍यांनी संपर्कात आलेल्‍यांना कोरोनाची चाचणी करून घेण्‍याचे आवाहन केले आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्‍या वाढीस लागल्‍याने आरोग्‍य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा प्रसार आणि फैलाव रोखण्‍यासाठीच्‍या आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना राबविण्‍यावर जिल्‍हा प्रशासनाने भर दिला आहे. त्‍यातच गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मंत्र्यांसह इतर राजकीय वरिष्‍ठांचे येणे-जाणे सुरू होते. या वेळी आयोजित केलेल्‍या बैठकांना जिल्ह्यातील वरिष्‍ठ प्रशासकीय अधिकारी उपस्‍थित होते.

गुरुवारी याच अनुषंगाने एका वरिष्‍ठ पातळीवरील बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीस जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विनय गौडादेखील उपस्‍थित होते. बैठकीस उपस्‍थित असणाऱ्या श्री.गौडा यांना नंतरच्‍या काळात सर्दी, खोकल्‍याचा त्रास जाणवू लागला. यामुळे त्‍यांनी चाचणी करून घेतली होती. चाचणीनंतर श्री. गौडा तसेच त्‍यांच्‍या पत्‍नीस कोरोनाची बाधा झाल्‍याचे समोर आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT