Ajit Pawar, Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP News : राष्ट्रवादीत आधे इधर, आधे उधर; या कारणास्तव मकरंद पाटलांची सभेकडे पाठ...

NCP Mumbai खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्या आमदार, पदाधिकारी बैठकी काल मुंबईत झाल्या.

Umesh Bambare-Patil

Satara NCP News : जिल्हा राष्ट्रवादीतील खासदार, दोन आमदारांसह बहुतांशी पदाधिकारी, खासदार शरद पवारांच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील सभेस उपस्थित राहिले. तर दोन आमदारांसह फलटण, सातारा, जावळी, खंडाळा, खटावमधील काही पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेस उपस्थित राहिले. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले. तर आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर करूनही आमदार मकरंद पाटील काही कारणास्तव उपस्थित राहिले नसल्याने चर्चेचा विषय ठरले.

खासदार शरद पवार Sharad Pawar व उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar या दोघांच्या बैठकी काल मुंबईत झाल्या. यातील कोणत्या बैठकीला कोण आमदार व पदाधिकारी उपस्थित राहिले, याची दिवसभर जिल्ह्यात उत्सुकता होती. अजित पवारांची बैठक सकाळी अकरा वाजता होती. त्यामुळे या बैठकीस जिल्ह्यातून आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, दीपक चव्हाण यांच्यासह फलटणचे पदाधिकारी, खंडाळ्यातील निम्मे पदाधिकारी, सातारा व जावळीतील पदाधिकारी, खटावमधील पदाधिकारी उपस्थित होते.

तर खासदार शरद पवारांच्या बैठकीस खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजकुमार पाटील, तसेच जिल्ह्यातील तालुकानिहाय पदाधिकारी, महिला आघाडी, युवती सेलच्या पदाधिकारी आदी उपस्थित होते.

सर्वच पदाधिकारी मुंबईला गेल्यामुळे राष्ट्रवादी भवनाला पहिल्यांदाच कुलूप लावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, काल कार्यकर्त्यांचा कौल घेऊन आम्ही शरद पवार यांच्यासोबतच असे जाहीर करूनही आमदार मकरंद पाटील बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. यासंदर्भात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्ही कालच भूमिका जाहीर केलेली आहे. आमदार मकरंद पाटील हे रुटीनच्या वैद्यकीय तपासणीसाठी गेल्याने बैठकीस उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या बैठकीस उपस्थित पदाधिकारी

किरण साबळे, राजेंद्र नेवसे, सचिन बेलागडे, अमित कदम, नंदकुमार मोरे, रमेश धायगुडे, बंडू ढमाळ, विक्रमबाबा पाटणकर, अरुण माने, नागेश जाधव, मंगेश धुमाळ, नीलेश कुलकर्णी, संभाजी घाडगे, रमेश शिंदे, बाळासाहेब शेळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार यांच्या बैठकीस उपस्थित पदाधिकारी

शशिकांत वाईकर, दीपक पवार, सतीश चव्हाण, शाफिक शेख, राजाभाऊ जगदाळे, संजना जगदाळे, श्रीमंत झांजुर्णे, मानसिंग जगदाळे, देवराज पाटील, सत्यजित पाटणकर, राजाभाऊ शेलार, प्रभाकर देशमुख, अजय जगताप, प्रमोद शिंदे, प्रताप पवार, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT