Chandrashekhar Bawankule, Dhairyashil Kadam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad BJP News : साताऱ्याची जागा कमळ चिन्हावर लढवणार; येथे भाजपचाच खासदार होणार : धैर्यशील कदम

Dhairyashil Kadam प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या (बुधवारी) कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त धैर्यशील कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Umesh Bambare-Patil

Karad BJP News : कराड उत्तरेतच नव्हे तर जिल्ह्यातील भाजप एकसंघ आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार असणार आहे. त्यासाठी साताऱ्याची जागा आम्ही कमळ चिन्हावर लढवणार आहोत, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.

भाजपचे BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule उद्या (बुधवारी) कराडच्या दौऱ्यावर येत आहे. त्यानिमित्त धैर्यशील कदम पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व शहराध्यक्ष एकनाथ बागडी, दक्षिणचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, महेश जाधव, माजी नगरसेवक सुहास जगताप, अजय पावसकर, मुकुंद चरेगावकर उपस्थित होते.

कदम म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीचा अजित पवार यांचा गट भाजपच्या साथीला आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याचा भाजपला निश्चित फायदा होणार आहे. त्यामुळे सातारा लोकसभेचा खासदार भाजपचाच असेल आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत मतदानही करणार आहे.

कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप एकत्रित आहे. दक्षिणेत अतुल भोसले यांचा गट आहे. उत्तरेत आम्ही सारे एक आहोत. पाटणला मित्रपक्षाचे आमदार आहेत. साताऱ्यात दोन्ही राजे भाजपकडे आहेत. कोरेगावातही मित्रपक्षाचा आमदार आहे. वाई मतदारसंघात मदनदादा भोसले भाजपचे आहेत, तर आमदार मकरंद पाटील अजित पवार गटाकडे आहेत.

जिल्हा बऱ्यापैकी भाजपमय झाला आहे. त्यामुळेच सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार भाजपचाच होईल, यात शंका नाही. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उद्या (बुधवारी) कराड शहरात फेरी काढणार आहेत. ते काही व्यापाऱ्यांशी संवाद साधून भाजपच्या कामाबद्दल चर्चा करणार आहेत. भाजप मोठा पक्ष आहे, तो आता प्रत्येक सामान्य व्यक्तीपर्यंत पोचविण्यासाठी प्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष थेट नागरिकांशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे त्याचा पक्षाच्या प्रतिमेला निश्चित फायदा होणार आहे.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT