पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : महायुती सरकारची सत्ता उलथवून टाका - सतेज पाटील

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या महायुती सरकारची सत्ता उलथवून टाका, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

सरकारनामा ब्यूरो

पट्टणकोडोली : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या महायुती सरकारची सत्ता उलथवून टाका, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.पट्टणकोडोली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू आवळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते धुळगोंडा पुजारी अध्यक्षस्थानी होते.

पाटील म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात स्वच्छ कारभार केला. भाजपला एकट्याला सत्ता स्थापन करण्याची हिंमत नसल्याने, त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पैसे देऊन फोडले.’’ पट्टणकोडोलीतील विठ्ठल बिरदेव देवस्थानला दीड कोटी रुपयांचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.

आवळे म्हणाले, ‘‘पाच वर्षांत गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे प्रामाणिकपणे काम केले. कोणताही गट-तट पाहिला नाही. त्यामुळे मतदारसंघात कोट्यवधीची विकासकामे करता आली. येत्या काळात प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी द्या.’’

माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, ‘‘देशात भाजप सरकारने अनागोंदी माजवली असून, राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे पाप भाजपने केले. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे.

यासाठी हातकणंगले मतदारसंघातून राजू आवळे यांना पुन्हा संधी द्यावी.’’ यावेळी साताप्पा भवान, भगवान जाधव, चरणदास कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. साई शैलजानाथ, के. बाबूराव, राहुल खंजिरे, शोभा शिंदे, उषा चौगुले, खाना अवघडे, सरदार सूर्यवंशी, आण्णा जाधव, धनाजी करवते, अभिषेक पाटील, परशूर कीर्तीकर, बाळू मोटे उपस्थित होते. कृष्णात मसूरकर यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण पुजारी यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT