Gokul Politics : गोकुळ वाचवण्यासाठी आज सतेज पाटील कोल्हापूरातील दसरा चौकातून मोर्चा काढणार आहेत. उद्या गोकुळच्या अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महायुती नेमकी काय भूमिका घेणार अशी चर्चा आहे. शासन नियुक्त सदस्यांमुळे महायुतीचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, जनभावना ही महायुतीच्या विरोधात जात असल्याची भीती नेत्यांना आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटलांच्या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतोय, यावर महायुतीची पुढील रणनीती ठरणार असल्याची चर्चा आहे.
आज मोर्चा झाल्यानंतर संध्यकाळीच महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. समविचारी आघाडीचा आजच्या मोर्चाला मिळणारा प्रतिसाद आणि हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे महायुतीचे लक्ष असणार आहे.
सविचारी आघाडीकडून चार शासन नियुक्त अध्यादेशाला सर्किट बेंचमध्ये आव्हान दिले होते. त्याबाबत आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे येथील निकालावर देखील महायुतीची रणनीतीची दिशा ठरणार आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत महायुतीमधील वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
महायुतीच्या नेत्यांची सोमवारी शहराच्या जवळ असणाऱ्या एका नेत्याच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बैठक झाली. या बैठकीत गोकुळचे अध्यक्षपद हे भाजपकडे देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. जास्त जागा असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सद्यःस्थितीत सावध हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून इतक्यात अध्यक्षपद नको, असा सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भाजपकडून या पदासाठी डॉ. चेतन नरके यांचे नाव आघाडीवर आहे. अन्यथा शिवसेनेच्या अंबरिष घाटगे यांना संधी मिळू शकते.
आमदार शिवाजी पाटील यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले की, गोकुळच्या निवडणुकीत महायुतीतील एका नेत्याने विरोधकांना मॅनेज करून आमच्या पक्षाचा घात केला. तसेच गोकुळमधे झालेला पराभव मान्य करून पुढे जायला हवे होते. मात्र, एका नेत्याने चार शासन नियुक्त सदस्यांच्या मागणीचा हट्ट धरला आणि त्याला सरकारनेही दुजोरा दिला. ही बाब मला मान्य नाही. अशामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण बिघडत आहे,
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.