Jayaprabha Studio kolhapur\ Rajesh kshirsagar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजेश क्षीरसागारांना वादातून बाहेर काढण्याची जबाबदारी सतेज पाटलांवर

kolhapur| Rajesh kshirsagar| Satej Patil| जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीप्रकरणी शिवसेनेचे नेते राजेश क्षिरसागर अडचणीत सापडले आहेत.

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : पुढील आठवड्यात जयप्रभा स्टुडिओच्या (Jayprabha Studio) प्रश्नावर मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू, अशी ग्वाही कोल्हापूरचे (Kolhapur) पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिली. जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंबंधी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री पाटील यांची रविवारी (२० फेब्रुवारी) भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीप्रकरणी शिवसेनेचे नेते राजेश क्षिरसागर अडचणीत सापडले आहेत. या वादातून बाहेर काढण्याची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील यांंनी स्विकारली आहे.

तसेच, ‘जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नावर आपणही आग्रही असून यावर लवकरच तोडगा काढला जाईल. पुढच्या आठवड्यात चित्रपट महामंडळाचे सदस्य, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संयुक्त चर्चा करुन यातून मार्ग काढू,'असेही सतोज पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी शिष्टमंडळात चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर,याही उपस्थित होते.

चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनीही यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जयप्रभा स्टुडिओ आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या जागेबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास प्रसंगी आम्हाला आत्मदहनही करावे लागेल, असा इशाराच सदस्यांनी दिला. तसेच जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे आणि कलाकारांसाठी खुला झाला पाहिजे. त्यासाठी स्टुडिओ समोरच गेल्या आठ दिवस आंदोलन सुरू आहे, असे सांगत शिष्टमंडळाने आंदोलनाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. स्टुडिओची जागा चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्याबरोबरच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ किंवा कोल्हापूर चित्रनगरीकडे वर्ग करा, अशी मागणीही शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, आंदोलनाच्या आठव्या दिवशी विविध संस्था, संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले. शहरातील घोडे व्यावसायिकही आपापल्या घोड्यांसह येत मिरवणूक काढत या आंदोलनाला पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेत ही मंडळी आंदोलन करत होती. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओचा परिसर शिवमय झाला होता. सार्थक क्रिएशन्स, माजी नगरसेवक संघटना, कृष्णा कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ, लेटेस्ट तरूण मंडळ, दत्ताजी काशीद महाराज चौक मंडळ आदी संस्थांनी आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिला.

काय आहे प्रकरण?

कोल्हापुरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची गेल्या दोन वर्षांपूर्वीच तब्बल 6 कोटी 50 लाखांना विक्री झाली आहे. कोल्हापुरकरच्या जनतेने लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागेच्या विक्रीविरोधात लढा दिला होता. मात्र याच कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे समोर आले. शासनाने ही वास्तू सांस्कृतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र स्टडिओची आधीच विक्री झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

स्टुडिओ विकण्याचे कोल्हापूरच्या कोणत्या बड्या नेत्यांचे कारस्थान होते, स्टुडिओ विकण्याचे पद्धतशीर प्लॅनिंग करण्यात आले, असल्याचा आरोपही करण्यात आला. 3 ऑक्टोबर 2019 रोजी स्टुडिओच्या विक्रीचे काम अतिशय गुप्तपणे पार पडले. या सर्व व्यवहरात कोल्हापूरमधील अनेक बडे नेतेही सहभागी असल्याचेही आरोप करण्यात समजते. ते नेते कोण आहेत, अशी चर्चा सध्या कोल्हापूरचच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे. जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांनी उभारलेला लढा महाराष्ट्राने पाहिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT