Shashikant Shinde, Abdul Sattar
Shashikant Shinde, Abdul Sattar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abdul sattar latest news : सत्तारांची सत्तेची मस्ती उतरवली जाईल... शशिकांत शिंदे भडकले...

Umesh Bambare-Patil

सातारा : शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून त्यांच्या मंत्री आणि आमदारांना जी सत्तेची मस्ती आली आहे, ही आजवरच्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांमध्ये कधी पाहायला मिळाली नव्हती. खासदार सुप्रियाताईंविषयी सत्तारांचे वक्तव्य निषेधार्य असून त्यांनी माफी मागावी अन्यथा सत्तारांची सत्तेची मस्ती उतरवली जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्य वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनीही सत्तारांवर सडकून टीका केली आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांवर जो 50 खोक्यांचा आरोप होतोय त्याचा उल्लेख केला.

तो उल्लेख करताना जर सत्तारांचा त्यामध्ये समावेश नसेल तर तो त्यांना लागण्याचा प्रश्नच येत नाही. परंतू, आपल्या नावाचा कुठे उल्लेख न करता तो आपल्याला झोंबला याचा अर्थ 'डाल मे कुछ तो काला है'. आमदार शिंदे म्हणाले, शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून त्यांच्या मंत्री आणि आमदारांना जी सत्तेची मस्ती आली आहे. ही आजवरच्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांमध्ये कधी पाहायला मिळाली नव्हती. एवढी मस्ती आली आहे की कलेक्टरला तुम्ही दारू पिता का असे ते विचारतात.

आज तर आमच्या नेत्या आणि भगिनी खासदार सुप्रियाताई यांच्या विषयी जे वक्तव्य केले ते निषेधार्य नव्हे तर जशास तसे उत्तर देण्यासारखे आहे. त्यांनी माफी तर सोडाच परंतू, ज्या पद्धतीने अरेरावीची भाषा करता. मतदाराला सुद्धा आपण भीक मागतो अशा पद्धतीने वक्तव्य करता याचा अर्थ तुमच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली.

ही हवा उतरायला वेळ लागणार नाही. ही हवा उतरवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या उधळलेल्या बैलांना आवर घालावा. जर आपल्याला आवरता येत नसतील तर जशास तसे उत्तर दिले जाईल आणि सबका हिसाब होगा और जरूर होगा, असा सज्जड दमही त्यांनी भरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT