Satyajeet Tambe News
Satyajeet Tambe News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satyajeet Tambe News : 37 वर्षांपूर्वी मामांनी जे केलं, तेच आज सत्यजीत तांबेंनी केलं!

सरकारनामा ब्यूरो

Satyajeet Tambe News : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत काँग्रेसमध्ये मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. याच मतदारसंघामधून सलग तीन टर्म निवडून आलेले आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाच यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने अधिकृतरित्या उमेदवारी दिली होती. मात्र सुधीर तांबे यांनी अचानकपणे माघार घेतली, तर सत्यजीत तांबे यांच्याकडून उमेदवारीसाठी दोन अर्ज भरण्यात आले होते. एक अर्ज त्यांनी अपक्ष म्हणून भरला होता. यावरूनच आता काँग्रेसमध्ये ठिणगी पडल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता काँग्रसमधला अंतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पटोले म्हणाले, काँग्रेसने सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली होती. मात्र आता जे काही घडले आहे, त्यासंदर्भात पक्षीय पातळीवर चर्चा करण्यात येईल. " परंतु आपल्याच काँग्रेस पक्षाच्या विरोधात सत्यजीत तांबे फक्त यांनीच नाही, तर तांबे यांचे मामा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, वडिल सुधीर तांबे यांनीही यापूर्वी बंड पुकारले होते. आताही तशीच काहीशी काँग्रेस पक्षाची स्थिती तांबे यांनी केली आहे.

थोरातांनी काँग्रेसशी कशा पद्धतीने बंड पुकारले होते, हा गोष्ट चार दशकांपूर्वीची आहे. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचे वडिल, ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक भाऊसाहेब थोरात आणि माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्यामध्ये निवडणुकीच्या उमेदवारीवरून जोरदार घमासान झाले होते. त्यावेळी काँग्रेसने उमेदवारीसाठी दोघांनाही डावलत पुण्यातल्या शंकुतला थोरात यांना उमेदवारी बहाल केली. यानंतर यांनी बंड पुकारत भाऊसाहेब थोरात यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यताच होती.

थोरात यांच्या कार्यकर्त्यांची त्यांनी अपक्ष निवडणूक लढावी, अशीच इच्छा होती. मात्र भाऊसाहेबांनी पक्ष विरोधात जाऊन, निवडणूकीत उतरण्याचे टाळले होते. मात्र यानंतर त्यांचे पुत्र बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले आणि ते यात विजयी देखील झाले.

निवडून आल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. या निवडणुकीनंतर आजपर्यंत बाळासाहेब थोरातच हेच या मतदारसंघातून सातत्याने विजयी होत आहेत. आता त्यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे हे देखील एकदा नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत काँग्रेसविरोधात बंड पुकारून विजयी झाले होते. २००९ च्या निवडणुकीतप्रतापदादा सोनवणे हे धुळे मतदारसंघातून निवडून आले होते. तर याच जागेवर पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून अॅड. नितीन ठाकरे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती.

त्यांचा व भाजपचे उमेदवार असलेले प्रसाद हिरे यांचा तांबेंनी पराभव केला. आणि यानंतर ते पुन्हा काँग्रेस पक्षात आले. सलग दोनदा ते या मतदारसंघातूननिवडून आले होते.दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहिलेले सत्यजीत तांबे यांचाही प्रवास मामा आणि वडीलांच्या मार्गाने सुरू झाला आहे.

यामध्ये तफावत एवढेच की, वडिलांना पक्षाकडून उमेदवारी मिळालेली असताना, त्यांनी उमेदवारीसाठीचा अर्जच केला नाही. आता त्यांच्य़ाऐवजी सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार झाले आहेत आहेत. त्यात नाना पटोले यांच्याकडून सत्यजीत तांबे हे आमचे उमेदवार नाहीत, असे म्हंट्ल्यामुळे आहे. त्यामुळे मामा बाळासाहेब थोरात यांच्यासारखेच सत्यजित तांबे यांनी काँग्रेसलाच झटका दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT