Satayjeet tambe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satyajeet Tambe News : सरकारनामा ओपनमाईक कार्यक्रमातच आमदारकीबद्दल तांबेंनी केलं होतं 'सूचक' वक्तव्य!

उमेश घोंगडे : सरकानामा ब्यूरो

Satyajeet Tambe : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष्य नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार कोण असणार, याकडे लागले होते. आता याबाबत (Nashik Graduate Constituency) सस्पेन्स अखेर संपला आहे. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळालेले सुधीर तांबे यांनी आपले पुत्र सत्यजित तांबे यांच्यासाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

सुधार तांबे यांच्या जागी आता सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान,'सरकारनामा'च्या पूर्वीच्या एका कार्यक्रमात सत्यजित तांबेंनी काँग्रेसबाबत खळबळजनक उत्तर दिले होतं. काँग्रेसमधून आतापर्यंत अनेक नेते बाहेर पडले. याच रोखाने काँग्रेस नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना 'सरकारनामा'च्या ओपन माईक कार्यक्रमात काँग्रेस सोडणार का? असा थेट प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तांबेंनी उत्तर दिले होते.

आता नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. 'तुम्ही काँग्रेस सोडणार का?' या प्रश्नावर तांबे म्हणाले, "मी काँग्रेस सोडणार नाही. चांगले वाईट दिवस येतच राहतात. मी काँग्रेसच्या संघटनेत 20 वर्षपासून कार्यरत आहे. राजकारणात चढ-उतार येतच राहतात. राहुल गांधीं भारत जोडो यात्रेमुळं काँग्रेस पक्षाला फायदा होईलच, असं मत 'सरकारनामा ओपन माईक सीजन 2' या कार्यक्रमात सत्यजित तांबे म्हणाले होते.

सरकारनामाच्या या कार्यक्रमात भाजप नेते अतुल भातखळकर, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद, मनसे नेते संदीप देशपांडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार मनिषा कायंदे उपस्थित होत्या.

तांबे पुढं म्हणाले, "मी भाजपामध्ये किंवा शिंदे गटात प्रवेश करणार नाही. परंतु त्यांना जर माझी मदत करायची असेल तर ते, करु शकतात. मला इकडं काँग्रेसमध्येच राहूनही ते मला मदत करू शकतात. मला तशी संधी देऊ शकतात. आपल्याला 'ईडी'ने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. ईडी म्हणजे म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मदत करावी," असे तांबे म्हणाले होते. आता पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

आज माध्यमांशी तांबे बोलत होते. "मी आता महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा आहे. काही तांत्रिक कारणामुळे मला काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म वेळेवर उपलब्ध होऊ शकला नाही, त्यामुळं मी काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून 2 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मी अजूनही काँग्रेस पक्षाचाच आहे. या निवडणुकीत राज्यातील सर्वच पक्षांना मी पाठिंबा देण्याचं आवाहन करत आहे. भाजप, दोन्ही शिवसेना आणि मनसे यांना सुद्धा मी पाठिंबा मागणार आहे. मी फडणवीस आणि बावनकुळे यांची भेट सुद्धा घेणार आहे," असे तांबे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT