Satyajitsinh Patankar during a recent meeting amid growing speculation about his entry into the BJP. sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satyajit Patankar : साताऱ्यात शरद पवारांच्या पक्षाला खिंडार; सत्यजितसिंह पाटणकर भाजपच्या वाटेवर

Satyajit Patankar NCP BJP : सोमवारी होणाऱ्या पाटणकर गटाच्या बैठकीला सत्यजितसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर आणि तालुक्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.

Roshan More

NCP SP VS BJP : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी पाटणकर गटाची सोमवारी (२६ मे) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सत्यजितसिंह यांच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सत्यजितसिंह शरद पवारांचे जवळचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिंरजीव आहेत.

पाटण विधानसभा मतदारसंघात विद्यमान पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे वर्चस्व आहे. सत्यजितसिंह यांना सलग तीनवेळा शंभूराज यांच्या विरोधात पराभव पत्कारावा लागला आहे. 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने सत्यजितसिंह यांना अपक्ष निवडणूक लढले. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागले. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जोरात सुरु होत्या.

राज्यात महायुतीचे सरकार आहे. केंद्रात देखील एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या आधी सत्यजितसिंह मोठा निर्णय घेणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच आपल्या आगामी राजकीय वाटचाल ठरविण्यासाठी पाटणकर गटाने सोमवारी बैठक त्यांनी बोलवली आहे. माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असल्याची माहिती पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी दिली आहे.

या बैठकीला सत्यजितसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर आणि तालुक्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन सत्यजीत यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

अन् गणित बिघडले...

2014 मध्ये सत्यजीत हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव असल्याने त्यांच्या निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शंभूराज देसाई यांनी बाजी मारली. यानंतर शंभूराज देसाई यांचा राजकीय आलेख चढताच राहिल्याने सत्यजीत यांना विजय नेहमीच हुलकावणी दिली. 2024 ला महाविकास आघाडीकडून सत्यजित हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तिकीट मिळाले अन् येथील राजकीय गणित बदलले. त्यामुळे सत्यजीत यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती.

पाटण पंचायत समितीमध्ये सत्ता

सत्यजीत पाटणकर गटाकडे सध्या पाटण पंचायत समितीची एकहाती सत्ता आहे. सत्यजीत पाटणकर सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात आहेत. नव्याने स्थापन केलेल्या शुगेरकेन फॅक्टरीच्या माध्यमातून सत्यजीत मतदारसंघातील शेतकऱ्यांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायेत. त्यामुळे त्यांनी शरद पवारांची साथ सोडणे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT