पाटण : विधानसभेला पराभव झाला असला तरी पाटणमध्ये (Patan) अद्याप आपणच बॉस असल्याचे माजी आमदार सत्यजित पाटणकर (Satyjit Patankar) यांनी दाखवून दिले आहे. पाटण नगरपंचायत निवडणुकीत (Patan Nagar Panchayat Election Results) गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraje Desai) यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवत पाटणकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने १७-२ अशी एकहाती सत्ता राखली आहे. भाजप व काँग्रेसला याठिकाणी भोपळा देखील फोडता आलेला नाही.
जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायतीवर पुन्हा झेंडा फडकविला आहे. ५ प्रभागात झालेल्या राष्ट्रवादीअंतर्गत मैत्रीपुर्ण लढतीत विद्यामान नगराध्यक्ष व माजी नगराध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेने मागील निवडणुकीत जिंकलेल्या दोन्ही जागा राखण्यात यश मिळविले असले तरी मंत्रीपद असतानाही त्यांना संख्याबळ वाढविण्यात अपयश आल्याचे निवडणुक निकालावरुन स्पष्ट होत आहे.
काँग्रेसने सहा जागेवर उमेदवार उभे केले होते मात्र त्यांना खातेही खोलता आले नाही. भाजपचे विद्यमान नगरसेवक सागर माने यांचा त्यांच्याच हक्काच्या प्रभागात नवख्या उमेदवाराकडुन पराभव पत्करावा लागला आहे. गटांतर्गत मोठा विरोध असणाऱ्या विद्यमान उपनगराध्यक्ष सचिन कुंभार यांनी विजय मिळविला असुन विद्यमान नगरसेविका संगिता देवकांत यांचे पुन्हा नगरपंचायतीत आगमन झाले आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस १४, शिवसेना २ व भाजप १ असे बलाबल होते. त्यामध्ये शिवसेनेने आपल्या जागा राखल्या असल्यातरी शंभुराज देसाई यांच्या मंत्रीपदाचा नगरपंचायतीत कोणताही परिणाम झालेला नाही. त्याचवेळी भाजपला एकमेव जागा गमवावी लागल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ १५ झाले असुन जिल्ह्यातील नेत्यांसह पाटण तालुक्यात राष्ट्रवादीचे मनोबल वाढविणारा हा निकाल असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.