Dilip Kambale, Udhav Thackeray
Dilip Kambale, Udhav Thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ठाकरे सरकारकडून अनुसूचित जाती जमातीची फसवणूक : दिलीप कांबळेंचा घाणाघात

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : अनुसूचित जाती जमातीच्या समस्या सोडविण्यासाठी आयोगाची नियुक्ती करण्यास ठाकरे सरकारने दीड वर्षांचा विलंब केला. जनहिताच्या अनेक योजनांवर स्थगिती येऊन आयोगालाही टाळे लावण्यात आले. या आयोगाचे अस्तित्व कागदोपत्रीच ठेवून सरकारने अनुसूचित जाती जमातीची घोर फसवणूक केली आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे माजी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला.

कांबळे म्हणाले, गेल्या दोन वर्षात अनेक घोटाळेबाजांना पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे विद्यमान सामाजिक न्याय मंत्री यांचे त्यांच्या विभागाकडे लक्षच नाही. तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत असून विद्यमान गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील काही बोलायला तयार नाहीत. राज्यात दलितांवर विशेषतः स्त्रियांवर अत्याचार होत असताना त्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत. यावरून ठाकरे सरकारचा प्रशासनावर धाक उरलेला नाही, हे स्पष्ट होते.

पदोन्नती समितीच्या अध्यक्षपदी त्याच जातीचा तसेच समस्यांची जाण असणारा प्रतिनिधी नेमायला हवा होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. दलितांच्या समस्या पवारांना काय कळणार? महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक आरक्षणाच्या संदर्भात घोळ घालून ठेवल्याचा आरोप कांबळे यांनी केला.

महाविकास आघाडीच्या प्रलंबित निर्णयाचा फटका अनुसुचित जाती जमातीच्या राज्यातील दहा टक्के लोकसंख्येला बसला असून रोजगार नोकरी पदोन्नती, आरक्षण शिक्षण, आरोग्य, जमिनीची मालकी, विद्यार्थी सुविधा, शिष्यवृत्ती आदी मुलभूत सुविधापासून वंचित ठेवण्याचा डाव ठाकरे सरकारचाआहे.

जातीय अत्याचारात बळी ठरणाऱ्यांना न्याय देणारा अनुसूचित जाती जमाती आयोगाला निधी पुरविण्यात ठाकरे सरकार टाळाटाळ करत असल्याने बेदखल आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षित रिक्त जागा भरण्याची टाळाटाळ होत असल्याने स्पर्धा परिक्षा पास झालेला युवक वैफल्यग्रस्त झाला आहे. गेल्या दोन वर्षात अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. या घटनांची आकडेवारी शासन लपवत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT