Shambhuraj Desai, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : पुढील वर्षीपासून साताऱ्यात शाही दसरा महोत्सव... शंभूराज देसाई

साताऱ्यात Satara दसरा महोत्सव Dasahara Mohotsav घेण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी सांगितले.

Umesh Bambare-Patil

मुंबई : सातारा जिल्ह्याला राजघराण्याची परंपरा आहे. येथे दरवर्षी दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो. पुढील वर्षीपासून हा शाही दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्यातून भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

साताऱ्यात दसरा महोत्सव घेण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगून शंभूराज देसाई म्हणाले, पुढच्या वर्षीपासून सातारा येथे शाही दसरा महोत्सवाच्या नियोजनाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत पालकमंत्री म्हणून मी स्वतः चर्चा करणार आहे. सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

हा जिल्हा शूरांची आणि वीरांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. राजघराण्याची परंपरा ही जिल्ह्यास आहे. ही परंपरा जगासमोर आणण्यासाठी पुढील वर्षीपासून सातारा येथे दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून साताऱ्याला जागतिक पातळीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT